प्रयागराजमध्ये लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त, बचावकार्य सुरू

प्रयागराजमध्ये लष्कराचे प्रशिक्षणार्थी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. प्रशिक्षणादरम्यान विद्यावाहिनी शाळेजवळील तलावात विमान कोसळले. दुर्घटना कशामुळे घडली याबाबत माहिती मिळू शकली नाही. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. विमानातील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान उड्डाणादरम्यान सामान्य स्थितीत होते. मात्र काही वेळातच विमानाने संतुलन गमावले आणि ते तलावात कोसळले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने पोलीस आणि प्रशासनाला घटनेची माहिती दिली.