
माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. ही घटना झारखंडमधील कोल्हानमध्ये मंगळवारी घडली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जगुआर या ठिकाणी भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. शहीद झालेले जवान अमित तिवारी हे झारखंडचे तर गौतम कुमार कॉन्स्टेबल बिहारमधील रहिवासी आहेत.

























































