अर्पिताचा आग्रह, ‘सलमान’च्या वाढदिवशीच करणार प्रसूती

1527

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याची बहिण अर्पिता खान-शर्मा ही दुसऱ्यांदा गरोदर असून लवकरच सलमानच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. मात्र यावेळेस अर्पिताने बाळाच्या जन्मासाठी एक अजबच आग्रह धरला आहे. आपल्या बाळाचा जन्म मोठा भाऊ सलमान खान याच्या वाढदिवसालाच व्हावा अशी अर्पिताची इच्छा आहे. त्यामुळे तिने सलमानच्या वाढदिवशीची सिझेरियन करून प्रसूती करण्याचा निर्णय घेतला आहे.


View this post on Instagram

My life in one frame My brother & My son. Thank you god for the choicest blessing

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

अर्पिताचे लग्न अभिनेता आयुष शर्मा याच्यासोबत नोव्हेंबर 2014 ला झाले होते. 30 मार्च 2016 ला अर्पिता व आयुष यांना पहिले बाळ झाले. अर्पिताचा पहिला मुलगा अहिल हा सलमानचा अत्यंत लाडका असून सलमानच्या सोशल मीडियावर अनेकदा त्याचे अहिलसोबत खेळतानाचे व्हिडीओ असतात. त्यावरून सलमान व अहिलचे जबरदस्त बॉडिंग दिसून येते. तसेच अर्पिता व सलमानचे नाते देखील खूप घट्ट आहे. सलमान त्याच्या लहान बहिणीचे सर्व हट्ट पुरवत असतो. त्यामुळेच अर्पिताने तिच्या लाडक्या भाईजानच्या वाढदिवशीच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानचा वाढदिवस 27 डिसेंबरला असतो. त्याच दिवशी अर्पिता देखील तिच्या बाळाला जन्म देणार असल्याने खान कुटुंबीयांसाठी यावर्षी डबल सेलिब्रेशन असेल.


View this post on Instagram

Love you @aaysharma & Ahil ♥️ courtesy @kvinayak11

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

आपली प्रतिक्रिया द्या