अनंत करमुसे मारहाण प्रकरण; गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना अटक व सुटका

ncp leader jitendra awhad

सिव्हिल इंजिनियर अनंत करमुसे यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. लगेच त्यांना ठाण्याच्या न्यायालयात हजर केले असता जामीनही मंजूर करण्यात आला.

ठाण्याच्या आनंद नगर भागात राहणारे अनंत करमुसे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या घटनेनंतर 5 एप्रिल रोजी आपणास आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण झाल्याची तक्रार करमुसे यांनी पोलिसांकडे केली होती.

करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तक नगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यात तीन पोलिसांचाही समावेश होता. आव्हाड यांच्या उपस्थितीत मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आज आव्हाड यांना या प्रकरणी अटक झाली. त्यानंतर काही वेळेतच न्यायालयाने दहा हजार रुपये व दोन जमीनदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.