डोनाल्ड ट्रम्पविरोधात अटक वॉरंट जारी

1882

मेजर जनरल कासिम सुलेमानी याच्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्याप्रकरणी इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ट्रम्प यांच्यासह 30 जण या हल्ल्याला जबाबदार असल्याचा इराणचा दावा आहे.

काही दिवसांपूर्वी सुलेमानी यांच्यावर झालेल्या ड्रोनच्या हल्ल्यात इराणच्या मोबलायझेशन फोर्सचा कमांडर अबू मेहती अल मुहंदीस हासुद्धा ठार झाला होता. त्याप्रकरणी ट्रम्प यांना ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलची मदत मागितली असल्याचे इराणचे वकील अली अलकासीमर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या