
चेकबाऊन्स प्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरोधात रांची न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. अमिषाने निर्माता अजय कुमार यांना दिलेला अडीच कोटी रुपयाचा चेक बाऊन्स झाल्याने तिच्याविरोधात हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
2018 साली ‘देसी मॅजिक’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अजयने अमिषाला 2 कोटी रुपये उधार दिले होते. मात्र पैसे परत करण्यास अमिषा टाळाटाळ करत होती. तसेच नंतर तिने अजयचा फोन घेणेही सोडले. त्यातच चित्रपट चालला नाही. यामुळे निर्मात्याने अमिषाकडे पैसे मागितले. त्यानंतर तिने अजय यांना अडीच कोटी रुपयांचा चेक दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. यामुळे अजयने रांची न्यायालयात अमिषाविरोधात फसवणूकीचा खटला दाखल केला. त्यानंतरही त्यांनी अमिषाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिने संपर्क केला नाही.
त्यानंतर न्यायालयाकडून अमिषाला समन पाठवले गेले. पण तरीही अमिषा न्यायायलात आली नाही. त्यामुळे तिच्या विऱोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. याआधीही अमिषावर 11 लाख रुपये घेऊन एखा कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला होता. एक लग्न सोहळ्यात डान्स करण्यासाठी अमिषाने 11 लाख रुपये घेतले होते. पण ती लग्नात गेलीच नव्हती.





























































