
टीम इंडियाचा क्रिकेटपटू अर्शदीप सिंग याने सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरून सध्या अर्शदीप कुणासोबत रिलेशनशिपमध्ये असेल याची चर्चा सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये चांगलीच रंगली आहे. अशात पंजाबी चित्रपट सृष्टीतील एका अभिनेत्रीसोबत अर्शदीपचे नाव जोडले जात आहे. समीरन कौर असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे.
नुकताच अर्शदीपने आपल्या स्नॅपचॅटवर काही स्टोरी शेअर केल्या होत्या. त्यात त्याच्या हातात एका मुलीचा हात होता. त्या मुलीच्या हाताच्या टॅटूवरून अनेकांनी अर्शदीप समीरन कौरला डेट करत असल्याचे म्हटले आहे. कारण समीरन कौरच्या हातावर जसा टॅटू आहे तसाच टॅटू अर्सदीपने शेअर केलेल्या फोटोतल्या हातावर आहे.
दरम्यान अर्शदीप व समीरने दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्शदीप सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्जमधून खेळतोय. तर समीरन ही मूळची जरी जम्मू कश्मीरची असली तरी तिचे शिक्षण पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून झाले आहे. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.























































