अभिनेत्रीचा लैंगिक अत्याचाराचा दावा खोटा, भावानेच केला धक्कादायक खुलासा

1590

प्रसिद्ध अभिनेत्री व बिग बॉसची स्पर्धक आरती सिंग हिने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा बिग बॉसच्या घरात केला होता. तिच्या घरातील नोकरानेच तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते. मात्र आरतीने कार्यक्रमात ओघाच्या भरात जास्तच काहितरी सांगितले, तसे काही तिच्यासोबत घडले नव्हते, अशी माहिती तिचा सख्खा भाऊ कृष्णा अभिषेक याने दिली आहे. त्याच्या या खुलाशामुळे फिनालेच्या काही तास आधी आरती खोटं बोलल्याचे समोर आले आहे.

arti-singh-11

‘आरतीवर बलात्काराचा प्रयत्न झाला नव्हता. तसा प्रयत्न होणार होता. मात्र त्याआधीच तो मुलगा पळून गेला. आम्ही त्याच्याविरोधात तक्रारही केली मात्र तो पुन्हा कधीच सापडला नाही. बिग बॉसमध्ये आरती ओघा ओघात जरा जास्तच बोलून गेली’, असे कृष्णा अभिषेकने एका मुलाखतीत सांगिले आहे.

krushna-abhishek-1

बिग बॉस च्या 13 व्या सिझनमध्ये छपाक चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अॅसिड अॅटॅक हल्ल्याची पीडिता लक्ष्मी अगरवाल आली होती. त्यावेळी घरातल्या काही सदस्यांनी त्यांच्यासोबत घडलेले प्रकार सांगितले होते. तेव्हा आरतीने देखील तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती नैराश्यात गेली होती व तिला पॅनिक अटॅक यायला सुरुवात झालेली असेही आरतीने त्यावेळी सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या