
>>चंद्रसेन टिळेकर
आपली शिकली सवरलेली मुले नोकरीसाठी वणवण भटकताना पाहिली की चुकचुकल्यासारखे होते. परंतु यासोबत काही तरुण असेही आहेत जे व्यवसायशिक्षणाच्या माध्यमातून स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत आहेत. श्रमप्रतिष्ठेला मिळणारी प्रतिष्ठा हे नक्कीच दिलासा देणारे चित्र आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अखेरीस 1 मे 1960 ला आकाराला आला. मराठी मनांना वाटले आता आपला उदयकाळ फारसा दूर नाही. उत्कर्षाचा उषकाल लवकरच होईल, अशी स्वप्ने तो पाहू लागला आणि काहीसा निर्धास्तही झाला. पण हळूहळू त्याच्या लक्षात आले की, आपली शिकली सवरलेली मुले नोकरीसाठी वणवण भटकताहेत, पण तिथे दुसऱयाच कोणाची तरी वर्णी लागल्यामुळे हात हलवीत परत येत आहेत.
इंटरव्यूला गेल्यावर मराठी तरुणांना हेही दिसत होते की, परप्रांतातील तरुणांच्या टोळधाडी आधीच येऊन तिथे बसलेल्या आहेत आणि त्याच्या हेही लक्षात आले की, इथे परप्रांतीय तरुणांनाच नोकऱया मिळत आहेत. भूमिपुत्र केवळ टाचा घाशीत हा सगळा प्रकार पाहात होता. त्याच्या लेखी कविवर्य सुरेश भटांच्या शब्दात सांगायचे तर ‘उषकाल होता होता काळरात्र झाली…’ असेच झाले होते. दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष आपापली चूल कशी पेटती राहील याची काळजी करण्यातच व्यग्र होते.
1966 साली शिवसेना स्थापन झाल्यानंतर मराठी तरूण विश्वात आणि एकूणच मराठी जनसागरात उमेदीचे वातावरण निर्माण झाले होते. इतर प्रांतीयांनी विशेषत दाक्षिणात्यांनी भूमिपुत्रांच्या तोंडचा घास पळविण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे शिवसेनेचे भूतो न भविष्यती असे स्वागत झाले. वृत्तपत्रसृष्टीतील महर्षी श्री. ह. रा. महाजनी यांनी याबद्दल सविस्तर असा लेख आपल्या वृत्तपत्रात लिहिला होता. (तेव्हा दैनिक ‘सामना’ नव्हता. फक्त ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक होते.) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अशी घटना म्हणजे कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दात, ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!’ अशीच होती.
असे असले तरी काही टीकाकारांनी टीकेचा सूरही लावला होता. त्यांच्या मते ‘मराठी माणसाने आपण होऊन ही परिस्थिती ओढवून घेतली होती. कुणाची तरी नोकरी करण्यापलीकडे मराठी माणसाला काही दिसतच नव्हते.’ अर्थात हा आरोप अगदीच दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता, कारण सत्यस्थिती हीच होती की पडेल ते काम करण्याची प्रवृत्ती अशी मराठी माणसाची कमीच होती. नोकरीपेक्षा छोटेमोठे काही उद्योग करावे अशी त्याची फारशी मानसिकता नव्हती. सेनेने यासंदर्भात पुढे मराठी तरुणांचे प्रबोधन करायला सुरुवात केली होती. परंतु एकूणच श्रमप्रतिष्ठेचे काहीसे वावडे मराठी मनाला आहे असाही अनुभव अधूनमधून येतच होता. ‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’ अशी आपल्या काहीजणांची वृत्ती असते हे अमान्य करता येण्यासारखे नाही. या संदर्भातील एक अनुभव इथे सांगावासा वाटतो. आमच्या कॉलनीमध्ये एकूण 200 घरे आहेत. रोज सकाळी उत्तर प्रदेशातील दोन तरुण घरोघर जाऊन इस्त्राrसाठी कपडे गोळा करत आणि दुसऱया दिवशी आणून देत. दिवसाला निदान 100 कपडे तरी त्यांना इस्त्राrसाठी मिळत होते. अकस्मात त्यांच्यात काहीतरी भांडण झाले व ते दोघे अचानक आपल्या गावी निघून गेले.
कॉलनीतील पांढरपेशा नोकरवर्गाची मोठी पंचाईत झाली. कारण त्यांचे कपडे अडकून पडले होते आणि नवीन कपडे इस्त्राrसाठी देता येत नव्हते. आमच्या
कॉलनीमध्ये सकाळ संध्याकाळ तरुण मुले नेहमी ािढकेट खेळताना पाहात होतो. मी त्यांना हाक मारली आणि विचारले, ‘तुम्ही सदा सर्वकाळ इथे खेळत कसे काय असता?’ तशी ती मुले म्हणाली,
‘काय करणार काका? अजून आम्हाला कुठे नोकरीच लागलेली नाही.’
मी त्यांना म्हणालो, ‘आपले नेहमीचे इस्त्राrवाले त्यांच्या गावी जाऊन बसलेत. मी तळमजल्यावरच राहतो. तेव्हा तुम्हाला इस्त्राr करण्यासाठी दोन बाकडे माझ्या अंगणात टाकता येतील. इलेक्ट्रिकचे कनेक्शनही देतो. नोकरी मिळेपर्यंत तुम्हा चार मुलांचे उत्तम अर्थार्जन होईल. ते भय्ये आणखीन काही दोन-तीन महिने परत येत नाहीत आणि आले तरी आपण त्यांना दुसऱया कॉलनीत जायला सांगू. बोला, आहे तयारी?’
मुलं थोडीशी घुटमळली आणि मला म्हणाली, “काका उद्या सांगतो.”
त्यानंतर मी तीन-चार दिवस वाट पाहिली, पण मी दिसो की ती मुले खेळ सोडून आपली तोंडे लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे माझ्या लक्षात आले. शेवटी मग न राहवून मीच त्यांना विचारले, ‘अरे त्या इस्त्राrच्या कामाचं काय झालं?’
तसा एक जण चुळबुळत म्हणाला, ‘काका, आम्ही घरी विचारलं, पण वडील म्हणाले, असली कामं करायला आपण काय धोबी आहोत का?’
हे ऐकल्यावर मी हतबुद्धच झालो. काय बोलावे तेच कळेना. आपल्या समाजामध्ये श्रमप्रतिष्ठेला प्रतिष्ठा नाही हे पुन्हा एकदा दृगोच्चर झाले. घरात आल्यावर मी माझ्या पत्नी निलिमाला हाक मारली. ती सुधीर भाऊ जोशी अध्यक्ष असलेल्या ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होती. मी तिला म्हणालो, ‘तुमची समिती, बँका, इन्शुरन्स कंपन्या इत्यादी आस्थापनांमध्ये मराठी तरुणांना नोकऱया मिळाव्यात म्हणून प्रशिक्षण वर्ग घेते आणि त्यामुळे हजारो मराठी तरुणांना उत्तम नोकऱया मिळाल्या आहेत याची मला कल्पना आहे. परंतु अर्धवट शिकलेल्या मुलांचं काय करायचं?’ तिचे म्हणणे पडले की मुलांची नाही तर त्यांच्या पालकांची मनोवृत्ती बदलावी लागेल.
वरील खेदजनक अनुभवानंतर मला उभारी देणारा वेगळा अनुभव आला तोही इथे सांगणे ाढमप्राप्त आहे. पार्ल्याच्या एका रस्त्यावरून येत असताना अचानक मला तीन मुलांनी गराडा घातला. साधारणत 18 ते 20 वयोगटातील ती मुले होती, त्यांनी मला विचारले, ‘सर, ओळखलं का आम्हाला?’
मला चेहरे ओळखीचे वाटत होते, पण नीटसे आठवत नव्हते. मग ती मुलेच म्हणाली, सर आम्ही कट्ट्यावरील तुमच्या शिबिरामध्ये येत होतो.’
‘अरे हो आता आठवलं. तुम्ही आता चांगलेच मोठे झाला आहात. कॉलेजात वगैरे जात असाल नाही का?’
तसे हसून ती मुले म्हणाली, ‘नाही सर, आमच्या तिघांपैकी कोणीही कॉलेजला जात नाही.’
मी आश्चर्याने त्यांना विचारले, ‘का बरं? काही आर्थिक अडचण होती का?’
‘थोडीशी तशी होतीच म्हणा. पण शिबिरात तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की, कोणतंही काम खालच्या दर्जाचं नसतं. आपले तरुण कष्टाची कामे करायला तयार नसतात. याउलट परप्रांतातील तरुण पडेल ती कामे करतात आणि उत्तमरीत्या आपली उपजीविका करतात. कोणापुढेही नोकरीची याचना ते करीत नाहीत. तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे कॉलेजातील शिक्षण घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी कितीतरी व्यवसाय तुमची वाट पाहात आहेत.’
‘हो, आठवतंय मला. पण मग आता तुम्ही नेमकं काय करताय?’
‘सर, आम्ही तिघांनी एकत्र येऊन एक छोटी कंपनी स्थापन केली आहे. मी प्लंबिंगचं काम शिकलोय. हा पेंटिंगचं काम करतो आणि हा इलेक्ट्रिशियनचं काम करतो. कॉलेजचं शिक्षण परवडणारं नसल्यामुळे आम्ही आय.टी.आय.मध्ये व्यवसाय शिक्षण घेतलं. या परिसरात कुठे नवीन बिल्डिंग उभी राहात असेल तर तिथे जाऊन आम्ही सबकॉन्ट्रक्ट मिळवतो. सर आमचं अगदी उत्तम चाललं आहे. तुमच्या शिबिरानेच आम्हाला ही प्रेरणा दिली. सर, हे आमचं कार्ड घ्या आणि काही काम असेल तर आम्हाला जरूर कळवा.’
सुरुवातीला जो प्रसंग सांगितला त्याने आलेले वैषम्य कुठल्या कुठे पळाले. ही तिन्ही मुले मराठीच होती आणि आपल्या पायावर उभी राहिली होती याचा कुणालाही आनंदच होईल, मलाही तो झाला. या मुलांनी श्रमप्रतिष्ठेला प्रतिष्ठा दिली होती. इच्छा असेल तर मार्ग सापडतो याचे हे ढळढळीत उदाहरण आहे.
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)




























































