
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम n [email protected]
आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही. आयुष्य अमूल्य आहे, जगभरातील संपत्ती खर्चूनही आपण आयुष्याचा एक क्षण विकत घेऊ शकत नाही. आयुष्याची किंमत त्यांना विचारा ज्यांच्या आयुष्यातील काहीच क्षण शिल्लक आहेत, पण त्यांना खूप जगायची इच्छा आहे. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे, फक्त संघर्ष कमी-अधिक असू शकतो. त्याशिवाय आपल्याला जीवनाची किंमत कळत नाही. जो सत्याच्या मार्गावर असतो तो नेहमीच निर्भयपणे जीवन जगतो.
जगातील सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये मनुष्य हा एकमेव असा सामाजिक प्राणी आहे, जो इतर प्राण्यांपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा बलवान असूनही आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतो. काळ हा सतत बदलत असतो, तो कधीच सारखा राहू शकत नाही. काळ बलवान असतो, सर्व काही शिकवून जातो. काळ चांगला असो वा वाईट, तो नक्कीच बदलतो. बऱयाच वेळा वाईट काळासाठी माणूस स्वतःच जबाबदार असतो, जसे – चुकीचे कृत्य, नियमांची अवहेलना, असभ्य वर्तन, अपराधीपणा, भावनांनी वाहून जाणे, विचार न करता निर्णय घेणे, इतरांवर अतिविश्वास किंवा अवलंबून राहणे, निष्काळजीपणा, व्यसनाधीनता, अमली पदार्थांचे व्यसन, चुकीची संगत, खोटा देखावा, लोभ, सहनशीलतेचा अभाव, असमाधान, नकारात्मक विचार किंवा स्वतःला कमी लेखणे, रागीट स्वभाव आणि इतर अनेक गोष्टी आपल्याला त्रासदायक परिस्थितीत आणतात. जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका की, राग आणि आनंदात भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय किंवा वचन देऊ नका.
दरवर्षी 10 सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून पाळला जातो, या दिवसाचा उद्देश जगभरात आत्महत्या रोखण्याबाबत जनजागृती करणे हा आहे. एका वर्षात सरासरी 7 लाख 03 लोक भीती किंवा नैराश्यामुळे आत्महत्या करतात. प्रत्येक आत्महत्येमागे आणखी 20 जण असण्याची शक्यता आहे, ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या वर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची थीम ‘कृतीतून आशा वाढवणे’ आहे. आपण सर्वजण आपापल्या स्तरावर कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी, शेजारी, व्यावसायिक, अधिकारी, सामाजिक-राजकीय नेते आणि सरकार या नात्याने आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करू शकतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, 2021 मध्ये देशात 1,64,033 आत्महत्या झाल्या. जगात क्रीडा, चित्रपट, व्यवसाय, विज्ञान, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र नाही, जिथे दिव्यांगांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले नसेल. दिव्यांग असूनही स्टीफन हॉकिंग हे जगातील प्रसिद्ध विद्वानांपैकी एक होते. समस्या सगळ्यांना दिसतात, पण ज्यांचे मनोबल उच्च असते, त्यांना सर्व काही शक्य वाटते. एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार आणि दृढनिश्चय आवश्यक असतो. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे, फक्त संघर्ष कमी-अधिक असू शकतो. त्याशिवाय आपल्याला जीवनाची किंमत कळत नाही. वाईट मार्गावर चालण्यासाठी भीतीने जगावे लागते, परंतु जो सत्याच्या मार्गावर असतो तो नेहमीच निर्भयपणे जीवन जगतो. मान्य आहे की, आजकाल सगळीकडे खूप समस्या दिसत आहेत, पण लोक जी चूक करतात, तीच चूक आपणही करावी असे नाही. काम छोटं असो वा मोठं, काम प्रामाणिकपणाचं असेल तर कधीच लोकलज्जेचा विचार मनात आणू नका.
इतिहास संघर्ष कथांनी भरलेला आहे, इतिहास फक्त त्यांनाच स्मरणात ठेवतो, जे प्रतिकूल परिस्थितीत खंबीर राहिले आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, स्त्र्ााrशक्तीसाठी शिक्षणाची ज्योत पेटवणाऱया सावित्रीबाई जोतिबा फुले, समाजात पसरलेल्या कुप्रथेशीं लढणारे समाजसुधारक संतमहात्मे, महापुरुष कोणत्याही संकटाला घाबरले नाहीत. आपल्या ध्येयावर ठाम राहिले आणि सामाजिक बदल घडवून इतिहास घडवला. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा जीव घेते तेव्हा ती आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी, समाज यांना कमजोर करून समस्या सोडून जाते. आजही कडाक्याच्या उन्हात, पाऊस, थंडी, बर्फवृष्टीमध्ये जीवाची पर्वा न करता देशाचे सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात, मृत्यू समोर असतानाही ते आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाही. जवान शहीद होऊनही आपल्या सर्वांच्या हृदयात नेहमी जिवंत असतात.
जगात कोणाला त्रास होत नाही? दरवर्षी पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, भूस्खलन, भूपंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील करोडो लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. लाखो लोक रस्त्यावर राहतात, करोडो लोक उपासमारीत आणि मूलभूत सुविधांअभावी जगत आहेत. कोणी अनाथ आहे, तर कोणी आजारी आहे. प्रत्येकाच्या आपापल्या समस्या आहेत. आपल्यापेक्षा जास्त लोक समस्यांना तोंड देत आहेत. लोकांचा संघर्ष ऐकला तर तुम्ही तुमचे दुःखही विसराल, अशा लोकांच्या समस्या आहेत. जीवनात कधीही आशा सोडू नका, नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या मेहनतीवर, क्षमतेवर विश्वास ठेवा. मनाने हरणारे पहिलेच पराभूत होतात, मनात विजय आहे तर जिंकणे सोपे असते. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, मनाने कधीही हरू नका. शक्य तितक्या निःस्वार्थपणे परमार्थाची भावना ठेवा. नेहमी सकारात्मक विचारांच्या लोकांसोबत रहा. निसर्ग आणि पशु-पक्ष्यांशी जवळीक ठेवा. कारण ते मानसिक शांतता राखण्यास मदत करतात. वाईट सवयीपासून नेहमी दूर रहावे, स्वास्थ्यकर अन्न घ्यावे आणि शारीरिक खेळ खेळावेत. कारण शरीर आणि मन उत्साही आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते. सुसंस्कृत वागणूक आणि ज्येष्ठांचा आदर नेहमीच असावा. नेहमी आनंदी रहा, अडचणींना घाबरू नका, तर त्यांच्याशी लढा. आव्हाने स्वीकारा आणि पुढे जा.



























































