
>> शिवानी गोंडाळ, (मेकअप आर्टिस्ट)
चेहऱ्याची त्वचा ही धूळ, सूर्यकिरण, वातावरणातील अशुद्धता, गर्मी यामुळे नेहमीच खराब होत असते. सिरम किंवा वेगवेगळय़ा प्रकारचे गुलाबजल आपण घरी बनवून ते आपल्या त्वचेवर वापरल्यास आपल्या त्वचेची हानी होत नाही. तसेच चेहऱयावर एक प्रकारची चमक येते. घरच्या घरी फेस सिरम आणि टोनर कसे करावे, हे जाणून घेऊ या.
नॅचरल सिरम हे तुमची स्किन खराब होण्यापासून किंवा तुमच्या स्किनवर फाइनलाइन येण्यापासून, सुरकुत्या येण्यापासून वाचवू शकते. त्यासाठी तुम्हाला या सिरमचा वापर सकाळ, संध्याकाळ असा करावा लागतो. तसेच हे सिरम लावल्यानंतर साधारण एक-दोन सेपंद तरी त्याचा मसाज तुम्हाला चेहऱयावर करावा लागतो.
फेस सिरम तयार करण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल, कोकोनट ऑइल तसेच गुलाब जल, मध यांचा वापर करू शकता. एलोवेरा जेल हे नॅचरल मॉइश्चरायझर असून सनबर्न, चेहऱयावरील डाग लाइट करण्यासाठी खूप मदत करते. तसेच खोबरेल तेल हे पिग्मेंटेशन डार्क सर्कल्स तसेच स्किन नॅचरल ठेवण्यासाठी मदत करते, तर मध हे तुमची स्किन मॉइश्चराइज करते.
लेमन ज्यूस, गुलाब जल आणि हनी या तिघांना एकत्र करूनही तुम्ही सिरम तयार करू शकता. तसेच मेथी थोडय़ाशा पाण्यामध्ये उकळवून ती गाळून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही एलोवेरा जेल, आपल्याला सूट होईल असे खोबरेल तेल किंवा इतर कोणतेही तेल तसेच त्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ‘ई’ पॅप्सूलदेखील घालू शकता आणि या तयार होणाऱया मिश्रणाचा तुम्ही रात्री झोपताना चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुऊन चेहऱयावरील मेकअप काढून झाल्यानंतर वापर करावा.
घरच्या घरी टोनर तयार करण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. संत्र्याची साल पाण्यात उकळवून ते थंड करून त्यानंतर त्याच्यामध्ये एलोवेरा जेल, गुलाब जल मिक्स करून ते पाणी तुम्ही टोनर म्हणून वापरू शकता. गुलाब जलचा वापर उत्तम टोनर म्हणूनही करता येतो.
गुलाब जल तुम्ही टोनर म्हणून हेअर स्प्रेसाठी किंवा स्पा करत असताना तसेच डोळ्यांच्या उपचारासाठी वापरू शकता. अशा प्रकारचे सिरम किंवा गुलाब जल तयार केल्यानंतर त्याचा वापरही नेहमी करा. त्वचेच्या वरच्या उपायांबरोबरच योग्य प्रमाणात पाणी पिणे, शुद्ध हवा घेणे, योग्य आहार घेणे तसेच योगा, व्यायामाचा वापर करून तुम्ही तुमच्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करू शकता.
गुलाब जल कसे बनवाल
गुलाब जल (रोझ वॉटर) तयार करण्यासाठी खरं तर गावठी गुलाबाचा जास्त उपयोग होतो. गावठी गुलाब न मिळाल्यास आपण इतर गुलाबांच्या पाकळय़ांपासूनही रोज वॉटर तयार करू शकता. एका भांडय़ामध्ये दोन ग्लास पाणी घेऊन त्यात छोटासा स्टॅन्ड किंवा वाटी ठेवून त्यावर तुम्ही ज्या भांडय़ामध्ये तुम्हाला हे रोझ वॉटर तयार करायचे अशी एखादी वाटी किंवा एखादे छोटेसे भांडे ठेवून भांडय़ाच्या आजूबाजूला पाकळय़ा पसरवून ठेवायच्या आणि त्यानंतर या भांडय़ावर एक झाकण ठेवावे. यासाठी तुम्ही काचेच्या झाकण असलेल्या भांडय़ाचा वापर करू शकता. हे झाकण जेव्हा तुम्ही उलटे ठेवता, तेव्हा त्या भांडय़ामध्ये त्याच्यावर मध्यभागी असलेल्या मुठीमुळे त्या भागातून पाणी आतल्या भांडय़ात पडते व या झाकणावर तुम्ही दहा-बारा आइस क्यूब ठेवल्यास आतमध्ये पाणी लवकर तयार होते आणि हे पाणी तुम्ही रोझ वॉटर म्हणून वापरू शकता. यातली दुसरी पद्धत अशी असते की, रोज गुलाबाच्या पाकळय़ा धुऊन घेतल्यानंतर तुम्ही एक ते दोन ग्लास पाण्यामध्ये या पाकळय़ा उकळवायच्या आणि त्या पाकळय़ांचा रस तुम्ही वापरू शकता, पण हा रस जास्त काळ टिकत नाही. वाफेमुळे तयार होणाऱया पाण्याचा वापर तुम्ही अगदी महिनाभर करू शकता.