रंगरंगोटी – वडिलोपार्जित वारसा

557

>> भरत शंकर वर्दम

घरातच दोन रंगभूषाकार असल्याने मेकअप ही कला आपसूकच हातात उतरली.

कला आत्मसात करण्यासाठीगुरूची आवश्यकता असते. नशिबाने माझे वडील शंकर वर्दम आणि माझे काका बाबा वर्दम मला गुरुस्थानी लाभलेबाबा वर्दम यांनी राजकमल स्टुडिओचे मालक व्ही. शांताराम यांच्या पहिल्या चित्रपटापासून शेवटपर्यंत रंगभूषाकार म्हणून काम केलेत्यांनी आपले भाऊ शंकर वर्दम (माझे वडील) यांना आपल्यासोबत घेतलेघरातच 2 रंगभूषाकार असल्यामुळे रंगभूषेबद्दल माझ्या मनात आवड निर्माण झालीमाझ्या वडिलांसोबत नाटकाच्या प्रयोगाला मेकअपची बॅग घेऊन जाऊ लागलो. मेकअप करताना निरीक्षण करू लागलो. पूर्वी ऐतिहासिक, पौराणिक नाटकांतील पात्रांच्या हातापायाला रंग लावावा लागे. माझी रंगभूषेबद्दलची ओढ पाहून ते काम मला दिले जाईत्यामुळे राम मराठे, प्रसाद सावरकर, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दत्ताराम या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभलामहाविद्यालयात असताना प्रथमच स्नेहसंमेलनाच्या रंगभूषेचे काम स्वतः हाती घेतलेत्यावेळी मी माझ्या भावांना मदतीला घेतलेरंगभूषेतील मिळणाऱया यशामुळे शिक्षण, नोकरी यापेक्षा रंगभूषेत जास्त रमू लागलो. नंतर तेच माझ्या उपजीविकेचे साधन झाले. नाटक करता करता फिरण्याची आवड झाली ती नाटकांच्या दौऱयामुळे. 10-15 दिवसांच्या दौऱयात बरेच कलाकारही मित्र झाले. आता जसं सुखसुविधा असलेल्या थिएटरमध्ये नाटकं होतात तशी थिएटर पूर्वी नसायची. त्यामुळे नाटकाच्या 3 तास आधी रंगमंच आणि नाटकांसाठी लागणारे सामान तयार करून घ्यावे लागत. मेकअपमनला तर मेकअप रूम तयार करून घेण्यापासून मेकअपसाठी लागणारे टेबल, खुर्च्या, आरसा, बल्ब, पाणी वगैरे वस्तू गोळा करेपर्यंत सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागत असे. पण यामुळे नाटकाच्या आधी वेळेवर पोहोचून सर्व गोष्टी जागच्या जागी आहेत की नाही हे बघायची सवय मला अजूनही आहे. आतापर्यंत श्रीराम लागू, अशोक सराफ, जयंत सावरकर, विजय चव्हाण, भरत जाधव, संजय नार्वेकर अशा दिग्गज कलाकारांचा मेकअप करण्याची संधी मला मिळालीपूर्वी नाटकांसाठी वापरले जाणारे दिवे प्रखर नसत. त्या कमी प्रकाशात अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अनुरूप गडद कपडे आणि हेवी मेकअप केला जात असे. आताच्या काळात शिमर किंवा चमकी वापरतात त्यासाठी पूर्वी इस्त्र्ााrतील अभ्रकाचा वापर केला जात असेआम्ही पूर्वी रंग आणि पॅनस्टीक घरी तयार करायचो. पूर्वी नाटक, मालिका आणि सिनेमा एवढीच माध्यमे होती रंगभूषेसाठी. पण आता शास्त्र्ााr नृत्यकला मेकअप, शॉर्ट फिल्म, लग्नाचे मेकअप, गाण्यांच्या अल्बमचे मेकअप अशा विविध प्रकारच्या माध्यमांतून रंगभूषा केली जातेआमच्या पिढीतल्या रंगभूषाकारांना एक फायदा झाला. रंगभूषेच्या उगमापासून आताच्या नवीन काळातील बदलापर्यंतच्या सर्व गोष्टींचा अभ्यास करायला मिळाला.नवीन पिढीने सतत काहीतरी नवीन शिकायची तयारी ठेवा. वेळेचा मान ठेवणे खूप गरजेचं आहे. कारण एकदा वेळेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर आयुष्य फार कठीण आहे.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या