करीयर :  वैद्यकीय समुपदेशन

वैद्यकीय समुपदेशक. करीयरची वेगळी वाट. रुग्णांच्या अडचणी, मानसिकता समजून घेऊन त्यांना आरोग्याच्या वाटेवर पुन्हा न्यायचे असते. 

भरकटलेल्या व्यक्तीला योग्य दिशा देण्याचे काम समुपदेशकच करू शकतात. त्यामुळे समुपदेशन हा हौस म्हणून करायचा व्यवसाय नसून एक जबाबदार व्यवसाय आहे. एका भरकटलेल्या व्यक्तीला योग्य दिशा देण्याचे काम जबाबदार समुपदेशकच करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी तरी योग्य समुपदेशनाची गरज लागू शकते. शिवाय सध्या वैद्यकीय क्षेत्रात होणार्‍या विविध घडामोडी, समज-गैरसमज यातून योग्य मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय समुपदेशानाचीही आवश्यकता भासते. वैद्यकीय शाखांतील अनेक समस्यांकरिता वैद्यकीय समुपदेक ही करीयरची एक वेगळी वाट होऊ शकते. अजाणतेपणी दाखवलेल्या चुकीच्या दिशेमुळे त्या व्यक्तीचे नुकसानही होऊ शकते त्यामुळे अचूक मार्गदर्शनाची काळजी समुपदेशकाला घ्यावी लागते.

आवश्यक गुण

 • समुपदेशकाने सहृदय असणे, त्याची ऐकण्याची कौशल्ये चांगली असणे गरजेचे आहे.
 • आपल्या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण असणे, आजार व ताणतणाव यातील सूक्ष्म फरक जाणण्याचे कसब, ज्ञान व समोरच्याची गरज यात तफावत असल्यास योग्य त्या तज्ञ व्यक्तीकडे त्यास पाठविणे आवश्यक आहे.
 • हौस, आवड, समाजास मदत या कारणासाठी समुपदेशन करू नये.

महाविद्यालये

 • मुंबई विद्यापीठ, कलिना
 • नाथीबाई ठाकरसी महाविद्यालय, फोर्ट.
 • के. जे. सोमय्या कॉलेज, विद्याविहार.
 • एल. एस. रहेजा कॉलेज, सांताक्रुझ.
 • नगीनदास खांडवाला कॉलेज, मालाड (प.).
 • झेवियर्स कॉलेज, मुंबई – 400101.
 • आर. डी. नॅशनल कॉलेज, वांद्रे.
 • रूपारेल कॉलेज, माहीम.
 • मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले.
 • किशनचंद चेलाराम कॉलेज, चर्चगेट.
 • सोफिया कॉलेज फॉर वुमन, मुंबई-26.
 • केळकर एज्युकेशन ट्रस्ट, मुलुंड.
 • एस.आय.ई.एस. कॉलेज, सायन.
 • महाराष्ट्र व्यवसाय मार्गदर्शन संस्था, मुंबई-1.

कामाचे स्वरूप

 • समुपदेशन म्हणजे केवळ बोलणे नव्हे. हे एक शास्त्र आहे. ती एक कलाही आहे! मला या क्लाएंट-रुग्णाला या सत्रात नेमके काय काय सांगायचे आहे हे शास्त्र आहे व ते त्याच्यापर्यंत खुबीने कसे पोहोचवायचे आहे ही एक कला आहे.
 • रुग्णांना त्यांच्या आजारावरील औषधोपचार घेण्यास आणि त्याला तोंड देण्यासाठी चालना देणे, प्रोत्साहित करणे.
 • ताणतणाव, व्यक्तिमत्त्व दोष, त्यासंबंधीच्या समस्या, त्यांचा आजारावर होणारा परिणाम समजून घेऊन त्यावर उपाययोजना सांगणे.
 • आजार बरा होण्याकरिता औषधोपचारांची गरज असते. योग्य आणि माफक दरात औषधोपचार कुठे होऊ शकतील याविषयी माहिती देणे.
 • फक्त समुपदेशनाने वैद्यकीय समस्या असलेली व्यक्ती बरी होईल की नाही याचे तारतम्यही समुपदेशकाला ठेवावे लागते.
 • समुपदेशक म्हणून आपली जबाबदारी समजून घेणे त्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षण घेणे.
आपली प्रतिक्रिया द्या