
लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला की, त्याचे काय काय परिणाम होतात हे आपण कायम अनुभवत असतो. मुलांनी कोणाला तरी फोन लावणे, चित्र-विचित्र शब्दांतले मेसेज ग्रुपमध्ये सेंड होणे असो किंवा एखाद्या ई-मेलला रिप्लाय जाणे असो, हे अनेक पालकांचे कायमचे अनुभव असतात. काही पालकांची थोडी मोठी मुले तर परस्पर वस्तू, खेळणी यांची खरेदी आणि गेम्समध्ये शस्त्रे विकत घेणे, पुढच्या लेव्हलसाठी स्टार खरेदी करणे यासाठी त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे पाठवत असल्याचे उद्योग करतात हे कटू अनुभवदेखील आपण ऐकत असतो, पण चीनच्या एका मातेला आलेला अनुभव सध्या प्रचंड चर्चेत आहे.
चीनमध्ये राहणाऱ्या ली यून नावाच्या एका 11 वर्षांच्या मुलीने तिच्या आईच्या मोबाईलवर आईच्या नकळत एका जुन्या वस्तूंची विक्री करणाऱ्या अॅपवरून 500 युआन म्हणजे साधारण 4700 रुपयांची खेळणी ऑनलाईन विकत घेतली. नशिबाने काही वेळातच ही गोष्ट तिच्या आईच्या लक्षात आली आणि तिने ताबडतोब ती ऑर्डर रद्द करून पैसे परत करण्याची मागणी केली. सर्वसाधारणपणे अशा वेळी विव्रेता ऑर्डर रद्द करण्याचे कारण जाणून घेतो आणि पैसे परत करतो. मात्र या विक्रेत्याने ली यूनच्या आईकडे चक्क माफीनामा आणि एका विचित्र व्हिडीओची मागणी केली.
विव्रेत्याने ली यूनच्या आईला ती ली यूनला रागावत आहे आणि तिला एक थप्पड मारत आहे असा व्हिडीओ चित्रित करून पाठवण्यास सांगितला. या व्हिडीओच्या जोडीला 1000 शब्दांचा एक माफीनामादेखील लिहून पाठवण्याचा आग्रह त्याने धरला. चिडलेल्या ली यूनच्या आईने त्या अॅपच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधला. मात्र आम्ही यात काही मदत करू शकत नसल्याने त्यांनी सांगितले. सध्या या विव्रेत्याने केलेली मागणी ही योग्य का अयोग्य आणि अशा प्रकारे एखाद्या मुलाला शिस्त लावायची विव्रेत्याची पद्धत योग्य का अयोग्य यावर मोठी खुमासदार चर्चा रंगलेली आहे.
स्पायडरमॅन


























































