इंडियन रेडक्रॉस सोसायटीची शतकपूर्ती

958

>> शाम दंडे

1920 साली हिंदुस्थानात इंडियन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली. रेडक्रॉस सोसायटी व रेड क्रिसेंट सोसायटी नावे वेगळी असली तरी संस्था एकच आहे. जगभर कोरोनाचे महासंकट निर्माण झालेले आहे. तेव्हा कोरोनाबाबत जाहीर करण्यात आलेली आचारसंहिता पाळणारच आहोत. यंदा या संस्थेच्या शतकपूर्ती महोत्सवी वर्षानिमित्त फक्त मानवी सेवा देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, अवर्षण, महापूर यासारख्या संकटात मानवी जीवन सापडते तेव्हा रेडक्रॉस सोसायटी ही नि:स्पृहपणे मानव सेवा करते. मानवी जीवन, मानवी मूल्ये आणि मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देऊनच हे कार्य केले जाते. मानवता, नि:स्पृहता, निष्पक्षता, स्वतंत्रता, एकात्मकता, स्वयंस्फूर्त मानव सेवा, वैश्विकता ही रेडक्रॉसची सात तत्त्वे आहेत.

1920 साली हिंदुस्थानात रेडक्रॉसची स्थापना करण्यात आली. देशभर रेडक्रॉसच्या 1100 शाखा आहेत. राष्ट्रपती इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यपाल महाराष्ट्र रेडक्रॉसचे पदसिध्द अध्यक्ष असतात, तर जिल्हाधिकारी जिह्याच्या रेडक्रॉसचे पदसिध्द अध्यक्ष असतात. मानवतेची सेवा करणे हा रेडक्रॉसचा धर्म आहे. रेडक्रॉसतर्फे समाजाचे आरोग्य राखण्यासाठी आरोग्यविषयक उपक्रमात रक्तदान चळवळ चालवणे, रक्तदान शिबिरे, प्रथमोपचार शिबिरे, लसीकरण, कुटुंब कल्याण मोहीम आदी कार्ये केली जातात. एचआयव्ही रुग्णांची काळजी घेणे, त्यांच्यावर उपचार करणे आदी उपक्रमही राबवले जातात.

आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकांना कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार ठेवणे, आपतकाळात अन्न, वस्त्र व निवाऱयाच्या सोयी पुरवणे, सामुदायिक स्वयंपाकगृह चालवणे, संकटकाळातील लोकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करणे, साथीचा रोगप्रसार थांबवण्यासाठी उपाययोजना करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, सामुदायिक व व्यक्तिगत सामुपदेशन आदी कामे केली जातात. आगामी काळात संस्थेत तरुण कार्यकर्त्यांची भरती होणार असून स्वच्छता, हात धुण्याची मोहीम, जलसंवर्धन व जलसाक्षरतेची मोहीम राबवण्यात येणार आहे.

शांततेच्या काळात संभाजीनगर जिल्ह्याच्या रेडक्रॉस सोसायटीने अतिशय महत्त्वाची कामे केलेली आहेत. मला आजही पहाटे 4.40 वाजता झालेला किल्लारीचा भूकंप आठकतो. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीची तत्परता पहा… मला जर्मन रेडक्रॉसचे अध्यक्ष अब्राहम यांचा पहाटे 5.10 वा. फोन आला, परिस्थितीबाबत त्यांनी विचारणा केली. 7 काजता तत्कालीन जिल्हाधिकारी प्रमोद माने यांनी संजय हिवरेकर यांना भेटण्यास सांगितले. लातूरचे जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नावे पत्र घेऊन आम्ही 12 कार्यकर्ते 2 जीप ठासून भरून रवाना झालो. तळणी या 90 टक्के नुकसान झालेल्या गावी गेलो. सर्वत्र पडझड, जनावरे मरून पडलेली, लोह्याचे मेडिकल ऑफिसर डॉ. बजाज यांच्यासह पारावरच दवाखाना सुरू केला. न बोलावता स्थानिक परिचारिका मदतीला आल्या. जीव तोडून केलेली तीन दिवसातील कामे कधीही विसरता येणार नाहीत. मला आजही आठवते… किल्लारी भुकंपग्रस्त भागाचा ताबा असलेले ब्रिगेडियर कोहली यांनी रेडक्रॉस कार्यकर्त्यांना सॅल्युट केला होता: ते म्हणाले होते, ‘लडाई चालू होती है तब हम जखमी जकानों को केवल रेडक्रॉस से ही जीने की आस रहती है!’

आता कोरोनाच्या उद्रेकाविरुध्द रेडक्रॉस कार्यकर्ते लढत आहेत. त्यांना आठ सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि अजेय चौधरी यांनी आम्हाला आपतकालीन नियंत्रण कक्षाचा कार्यभार सोपवला. या क्षेत्रात सेवारत सर्व संस्था वैद्यकीय यंत्रणा, प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे काम आम्ही करीत आहोत. विशेषत: स्थलांतरीत मजुरांची समस्या सोडवण्यासाठी आम्ही विशेष कार्य करू शकलो.

आमचा एक कार्यकर्ता राजेंद्र राठी यांनी हा विषय अजेय चौधरींपुढे मांडला. संबंधित स्वयंसेवक संस्था व जिल्हा प्रशासन यांच्यात नियोजन करून एनजीओंच्या व्हॉट्सअप ठुपआधारे 100 टक्के सुसूत्रीकरण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. काही सधन कुटुंबियांना मजूर कुटुंबांचे पालकत्व देण्यात आले. किमान महिनाभराचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला. पहिल्या 3 दिवसांत 500 कुटुंबीयांना शिधावाटप करण्यात आले. नंतर आणखी 500 कुटुंबियांची व्यवस्था करण्यात आली. सचिव प्रज्वल मिठावाला यांनी याचे नेतृत्व केले. विशेषत: अजय देशपांडे, राजेंद्र राठोड, संदीप कोरान्ने, चेतन सुहिंदा, किशोर गठडी, अनंत बोरकर, विलास काबरा, प्रमोद हिवरेकर युद्धजन्य परिस्थितीत काम करत आहेत.

(लेखक रेडक्रॉस सोसायटीचे संभाजीनगर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या