
>> अरूण
आता सुरू असल्1ाsला मराठी महिना पौष संपला की आपल्य्याकडे लग्नसराई सुरू होईल. पूर्वीच्या काळी, म्हणजे गेल्या तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत, लग्नसमारंभाला किती मंडळी आली होती ते सांगताना `अमुक एक पानं झाली’ असं म्हटलं जायचं. जेवणाच्या ताटासाठी किंवा थाळय़ासाठी `पान हा शब्द रूढ झाला तो पळसाच्या पानांच्या पत्रावळी किंवा केळीच्या पानांवरून. आजही दक्षिण हिंदुस्थानात ही परंपरा मोठय़ा प्रमाणात दिसते. याचं कारण म्हणजे केळीची मोठय़ा प्रमाणावर होणारी लागवड. तिकडे आणखी एका प्रकारची पानं भोजनासाठी वापरतात ती कमळाची.
अनेक पाणवनस्पतींची किंवा विपुल पाण्यावर वाढणाऱया वनस्पतींचा पर्णविस्तार खूप मोठा असतो. मग सर्वात जास्त आकाराचं पान कोणतं? ते आपल्याकडच्या जैववैविध्यात दिसतं का? अशी विशाल पानं मुख्यत्वे पर्जन्यवनात (रेन फॉरेस्ट) होतात. आपल्याकडे केरळात पर्जन्यवन आहे. अतिपूर्वेच्या आसामसारख्या राज्यांमध्येही भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे तिथेही विशालपर्णी वनस्पती असतात. `राफिया पाम’ नावाच्या पर्णवनस्पतीचं एक पान भलंमोठं म्हणजे सुमारे 80 फूट (25 मीटर) लांब आणि 10 फूट (3 मीटर) रंद असतं!
ही पान `कम्पाउन्ड लीफ’ प्रकारातली. म्हणजे निसर्गत:च एकाला एक जोडकाम करून एक मोठ्ठं गोलाकार पान तयार होतं. (अनेक छोटय़ा आरशांची महादुर्बिण व्हावी तसं) ही वनस्पती दक्षिण आफ्रिकेच्या विषुववृत्तीय जंगलात आणि पूर्व ऑस्ट्रेलियातही मोठय़ा प्रमाणावर आढळतात. त्यावर माणसं उभी राहू शकतात!
याउलट, वॉटरमील किंवा `डकवीड’ या पाणवेलीची पानं अत्यंत सूक्ष्म एक मिलिमीटरपेक्षाही लहान आकाराची असतात. व्हिक्टोरिया किंवा राफिया पाम या वनस्पतीचं एक पान, दोन्ही हात फैलावले तरी त्या आकारात न मावणारं, तर `वॉटरमील’ची पानं तलहातावर शेकडय़ांनी सामावतील इतकी छोटी.
निसर्गाचं रूपचं असं सूक्ष्मतेकडून विराटाकाराकडे जाणारं आपण ज्या पृथ्वीवरच्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचा विचार करतो, तो आपला ग्रहसुद्धा विराट विश्वात धुलीकरणासारखा आणि ते दिसणारं विश्वसुद्धा एकूण विश्वाच्या अवघं चार टक्के. आपल्या `विराटतेच्या’ कल्पनाही किती `सूक्ष्म’ आहेत हेच यातून जाणवत राहतं.


























































