प्रकाशमय… ‘दादा’ पर्व…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

बीड जिल्ह्याच्या या कसदार मातीने अनेक घराणे राजकीय पटलावर उभे केले. त्यात सोळंके कुटुंब नक्कीच आघाडीवर. तब्बल 50 वर्षापासून सोळंके परिवार राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत यशस्वी पिढी निर्माण करण्याचे काम करत आहे. मतदारसंघाचा विकास कसा साधावा हे माजलगाव मतदारसंघात आल्यानंतर समजते. माजी उपमुख्यमंत्री स्व.सुंदररावजी सोळंके यांनी सत्तेच्या माध्यमातून विकासाचा पाया मजबूत केला आणि मतदारसंघाच्या विकासाचा कळस चढवण्याचे काम गेल्या 25 वर्षापासून आमदार प्रकाशदादा सोळंके  यांनी निष्ठेने आणि विश्वासाने केले आहे. माजलगाव मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम प्रकाशदादा सोळंके यांनी केले. एक विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोळंकेंमुळे माजलगाव सुजलाम सुफलाम झाला आहे. ऊसतोड कामगार ऊस उत्पादक झाला. हजारो पटीने सिंचन क्षेत्र वाढले. सक्षम कारखाना उभा केला. कार्यकर्त्यांना बळ दिले. वर्षानुवर्ष हातात असलेल्या सत्तेचा फायदा मतदारसंघाच्या विकासासाठी केला. यातूनच सधन आणि विकासात्मक मतदारसंघ उभा राहिला. अशा कर्तृत्ववान, सामर्थ्यवान आ.प्रकाशदादांचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा.

नुसतेच जमिनीचे विस्तीर्ण पट्टे, ना पाणी, ना शेतीचा विकास, अवर्षणग्रस्त माजलगाव मतदारसंघाला सोळंके परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भगीरथ सापडला. विकासाचा पाया स्व.सुंदररावजी सोळंके यांनी मजबूत केला आणि कळस चढवण्याचे काम आ.प्रकाशदादा सोळंके यांनी केले. तब्बल 50 वर्षापासून राजकीय पकड या मतदारसंघावर असणाऱ्या सोळंके कुटुंब आणि माजलगाव मतदारसंघ यांचं नातं काळाच्या ओघात अधिक घट्ट होत गेलं. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडली ती सोळंके कुटुंबाने. स्व.सुंदररावजी सोळंके, आ.प्रकाशदादा सोळंके यांनी आपल्या कर्तृत्वाने माजलगाव मतदारसंघाचा स्वप्नवत कायापालट केला. संपूर्ण मतदारसंघ आज सिंचनाखाली आणण्याचे काम या भगीरथांनी पूर्ण केले. केवळ शेतीला मुबलक पाणीच आणले नाही तर माजलगाव सहकारी साखर कारखान्यासारखा सक्षम कारखाना उभा केला, तो विश्वासाने चालवला.

आज स्व.सुंदररावजी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माजलगाव मतदारसंघाचा प्रत्येक शेतकरी स्वावलंबी झाली. त्याचे आर्थिकमान बदलले, शैक्षणिक चळवळ मार्गी लागली. कौटुंबिक प्रगती साधली गेली. माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यातील प्रत्येक नागरीक सक्षम झाला. विकासाच्या वाटेवरून जात असताना विचारधारा बदलत गेली, राहणीमान बदलत गेले. जीवन जगण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. हा कायापालट करण्याचे भाग्य सोळंके परिवाराच्या खात्यावर जाते. गेल्या 30 वर्षापासून आ.प्रकाशदादा सोळंके माजलगावच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. अनेक संघर्षांना सामोरे जात असताना त्यांनी नैतिकता आणि नितीमत्ता डोक्यात ठेवली. विरोधकांनी त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला मात्र सामान्य जनता ही कायम सोळंके परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. एक दोन नव्हे तर तीन पिढ्यांना आशिर्वाद देण्याचे काम माजलगाव मतदारसंघातील जनतेने केले आणि या आशिर्वादाची परतफेड कशी करावी ते सोळंके परिवाराने दाखवून दिले.

माजलगांव मतदारसंघातला झालेला विकास नेत्रदीपकच ठरला. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात सधन तालुका म्हणून माजलगावकडे पाहिले जाते. गावागावात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारी तरूणांची पिढी उभे करण्याचे काम आ.प्रकाशदादा सोळंके यांनी केले. जेवढे चांगले करता येईल तेवढे चांगले करण्याचे प्रयत्न त्यांनी केले म्हणूनच राजकारण निवडणुकीपुरते मर्यादित राहिले. गावागावामध्ये शांतता नांदली. शेतकरी सधन झाला, उद्योजक आपल्या पायावर उभा राहिला. सतत पंधरा वर्षे स्व.सुंदरराव सोळंके हे महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्याचे मंत्री म्हणून काम पाहत होते. कोणत्याही खात्याचे मंत्री झाले तरी या खात्याच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघासाठी काय करता येईल याचा विचार ते करत गेले. त्यांचीच पुनर्रावृत्ती आ.प्रकाशदादा सोळंके यांनी केली.

20 वर्षाासून आमदार असलेल्या प्रकाशदादा सोळंके यांना अपवादात्मक पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र खचून न जाता काम करत राहिले आणि सगळे विश्वासू विरोधात गेले असतानाही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची किमया त्यांनी दोन वर्षापूर्वी साधली. आज माजलगाव मतदारसंघात प्रकाशदादांची पकड एवढी मजबूत आहे की, विरोधक कुठेच दिसत नाहीत. तरीही डोक्यात कधी हवा गेली नाही, विकासाबाबत गंभीर राहिले, गुर्मीत कधी राहिले नाहीत. डोक्यात एकच विचार कोणत्या योजनेतून काय करायचे आणि त्या योजनेचा फायदा जनतेला कसा होईल.

एकीकडे माजलगाव मतदारसंघ राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला असताना गावागावात सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते, सांडपाण्यासाठी नाल्या, समाजमंदिरे, सभागृहे, शादीखाने, मंगल कार्यालये अशी विकासाची गंगा वाहत गेली, विकासात कधी कटुता येऊ दिली नाही. विरोधकांच्या गावाचाही त्याच तुलनेत विकास घडवून आणण्याचे काम त्यांनी केले. सतत कामात आणि मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रीत असणाऱ्या प्रकाशदादा सोळंकेंनी वडवणीचा अप्पर कुंडलिका प्रकल्प मार्गी लावला. आरणवाडीचा साठवण तलाव केला. आता माजलगाव धरणातून उपसा सिंचन योजनाची फाईल त्यांनी हातावर घेतली आहे. एकदा फाईल हातावर आली की काम फत्ते म्हणून समजा, कारण सततचा पाठपुरावा आलेल्या अडचणींवर मात आणि यश याचा मेळ लावण्याची कला दादांमध्ये आहे. उपसा सिंचन योजना सध्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. भविष्यात ही योजना मतदारसंघासाठी वरदान ठरणारी आहे.

ही आहेत बलस्थाने सोळंके कुटुंबाच्या 60 वर्षाच्या दैदिप्यमान राजकीय वाटचालीत सामान्य जनता बलस्थान आहे. 25 वर्षे आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघात अपवाद वगळता एकहाती सत्ता राबवली आहे. दादा म्हणतील तीच पूर्वदिशा अशी परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आहे. त्यांची बलस्थानं म्हणजे मतदार संघातल्या सर्व संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. काय आहे त्यांच्या ताब्यात

  • माजलगाव सहकारी साखर कारखाना
  • माजलगाव पंचायत समिती
  • माजलगाव नगर पालिका
  • माजलगाव खरेदी विंक्री संघ
  • माजलगाव बाजार समिती
  • सिद्धेश्वर बँक
  • धारूर बाजार समिती,
  • धारूर पंचायत समिती
  • वडवणी पंचायत समिती

मतदारसंघातील 11 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 9 जिल्हा परिषद सदस्य दादा गटाचे आहेत. उपसा सिंचन योजना मार्गी लागल्याने आणि वडवणी तालुक्यातील अप्पर कुंडलिका प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त वडवणी तालुका पाणीमय झाला आहे. डोंगर भागात ऊसाचे उत्पादनमोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. आ.प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प मार्गी लावला. केवळ एका तालुक्याचे हित जोपासले नाही तर गोदावरी नदीवर बॅरेजेस उभारले. त्यामुळे गोदावरी बारा महिने पाणीदार राहिली. सिंदफणा नदीवर उभारलेले बॅरेजेस शेतकऱ्यांचे तारणहार ठरले. कुंडलिका नदीवरील बॅरेजेस कामी आले. आरणवाडी येथील साठवणतलाव, धारूर तालुक्यातील असंख्य गावांसाठी महत्वाचा ठरला. केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर प्रकाशदादा साडे सहाहजार हेक्टर जमिन सिंचनाखाली आणणाऱ्या माजलगाव उपसा सिंचन योजनेच्या कामात व्यस्त आहेत. उपसा सिंचन योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमुळे संपूर्ण मतदारसंघातील शेतीची पाण्याची तहाण भागणार आहे. माजलगाव उपसा सिंचन योजना ही प्रकाशदादांसाठी स्वप्नव्रत आहे, आणि ती योजना दादा मार्गी लावणार आहेत.

असे आहेत दादा, अन् टिम सोळंके

चारवेळा आमदार त्यात महसूल, सहकार सह पाच महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवलेले प्रकाशदादा सोळंके यांचे सर्व लक्ष नेहमीच आपल्या मतदारसंघावर राहिले आहे. साधे सरळ आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची वैशिष्टये. गोड बोलून कार्यक्रम करण्यापेक्षा कडवट बोलून चांगले काम करणे हा त्यांचा स्वभाव, डावपेच कधी जमले नाही ना द्वेषाचे राजकारण जमले. जनतेसाठी काय करता येईल,विकासाच्या कोणत्या योजना राबवता येईल, कोणत्या योजनांमुळे आपल्या मतदारसंघाला फायदा होईल हेच सतत डोक्यात. म्हणूनच मतदारांनी दादांना डोक्यावर घेतले.

तसा माजलगाव मतदारसंघ राजकीय दृष्टया संवेदनशील तितकाच सुसंस्कृत असा राहिला आहे. मग माजी उपमुुख्यमंत्री स्व.सुंदरराव सोळंके, माजी आमदार गोविंदरावजी डक, मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, माजी आमदार बाजीराव जगताप, माजी आमदार आर.टी.देशमुख किंवा विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी एकमेकांना विरोध केला तो तात्विकच, खुनशी राजकारण माजलगाव मतदारसंघात कधीच बघण्यास मिळाले नाही. विरोधक आणि सत्ताधारी जेव्हा समोरासमोर आले तेव्हा अदबीनेच आणि आदरानेच एकमेकांशी वागले. पुढे प्रकाशदादा सोळंके यांनी एकहाती सत्ता राबवत असताना द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. तसे सोळंकेंमध्ये राजकीय बदल्याची भावना कधी जाणवली नाही. द्वेषाचे आणि त्वेषाचे राजकारण जमले नाही. राजकीय डावपेचाला थारा दिला नाही. आहे ते स्पष्ट बोलायचे, मग आपला असो किंवा विरोधक ही जमेची बाजू. ही शिकवण  त्यांना स्व.सुंदरराव सोळंके यांच्याकडूनच शिकण्यातून मिळाली. आ.प्रकाशदादा सोळंके कार्यकर्त्यांवर ओरडतात, अशी भावना कार्यकर्त्यांची असते. मात्र त्या ओरडण्यामध्येही आपलेपणा असतो. प्रेम असते, तळमळ असते, हे ही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे दादांचे ओरडणे किंवा खेकसणे फारसे मनावर घेतले जात नाही.

मागे वळून पाहताना 28 वर्षाची राजकीय कारकिर्द कशी गेली, विकासाची कामे किती झाली याची यादी न संपणारी आहे. पुढे काय करायचे राहिले याबाबत बोलताना प्रकाशदादा म्हणत असतात विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. नव्या समस्या, नवे प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. कामे कधीच संपत नाहीत. फक्त लोकप्रतिनिधींचा सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा असतो. ही त्यांची भूमिका सर्व काही सांगून जाते. जेव्हा नेत्रदिपक यश मिळत असते, नेता यशस्वी होत असतो. तेव्हा त्या नेत्याला पाठबळ देण्यासाठी असंख्य अदृश्य हात कामाला लागलेले असतात. माजलगाव मतदारसंघातही असेच आहे. अनेक शेकडो हात प्रकाशदादांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याने प्रकाशदादांची वाटचाल यशस्वी ठरली. यात महत्वाचा उल्लेख तो यांचा करावा लागेल.

धैर्यशिल सोळंके – आ.प्रकाश सोळंके यांचे लहाने बंधू धैर्यशिल सोळंके, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य सभापती, स्व.सुंदरराव सोळंके सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन, ग्राऊंडवर राहून जनमाणसामध्ये वावरणारे हे व्यक्तीमत्व, दिवसातील आठ तास साखर कारखान्यावर थांबून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, त्याशिवाय आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे शेतीचे प्रयोग करून शेतकऱ्यांना यशाचा कानमंत्र देवून पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनोखे प्रयोग राबवण्यासाठी प्रेरित करणारे काका, यांना मानणारा एक वेगळाच वर्ग, जो राजकारणापासून कोसो दूर मात्र धैर्यशिल सोळंकेंच्या संपर्कात आला की तो सोळंके परिवाराचा कौटुंबिक सदस्यच झाला म्हणून समजा, अशा वेगळ्या क्षेत्रातील लोकांचे पाठबळ सोळंके परिवाराच्या पाठिशी राहिले.

सौ.मंगलताई सोळंके- आ.प्रकाशदादा सोळंके यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंगलताई प्रकाशदादा सोळंके, गंगामसला सर्कलमधून मोठ्या मताधिक्याने जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या. एका गटाने धोका दिल्याने त्यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हुकले. गेल्या वीस वर्षापासून सौ.मंगलाताई सोळंके माजलगाव मतदारसंघात बचत गटाची चळवळ उभारत आहे. शेकडो बचत गट आणि हजारो बचत गटांच्या महिला त्यांच्या संपर्कात आल्या. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांची मोठी प्रगती झाली. बचत गट आणि त्या महिला विकासाच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या. यासह मंगलताई सोळंके यांनी खाजगी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले.

जयसिंह सोळंके- एकीकडे राजकीय क्षेत्रामध्ये चुलत्या-पुतण्याचा छत्तीसचा आकडा असताना माजलगाव मतदारसंघामध्ये मात्र सकारात्मक आणि समाधानकारक चित्र पाहाण्यास मिळते. जयसिंह धैर्यशिल सोळंके हे आ.प्रकाश सोळंके यांचे पुतणे होय. जयसिंह आपले चुलते प्रकाशदादांकडून राजकीय धडे पूर्णात्वास नेत आहेत. मतदारसंघात अनेक मोहिमेत बहुतांश वेळा काका-पुतणे सोबत असतात. जयसिंह सोळंके यांचे शिक्षण सुरू असताना 2011 साली त्यांना पुण्यावरून मतदार संघामध्ये निवडणुकीच्या मदतीसाठी आणले. आणि ते राजकारणातच रमले. सध्या ते जिल्हा परिषदेचे सभापती आहेत. मतदारसंघाचा खडानखडा माहिती असणारा तरूण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. शेकडो तरूणांचे पाठबळ त्यांच्या पाठिशी आहे. एक संघटन कौशल्य युवा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अतिशय नम्र स्वभाव, कामाची उरक आणि अनुभवाची शिदोरी असे वर्णन जयसिंह सोळंकेंचे करता येईल.

(Advertoial)