
> मृणाल घनकुटे
माणसाला अमर्याद सौंदर्य आणि वाढत्या वयातही आपला चेहरा तरुण दिसावा असे वाटते. वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांसारखी चिन्हे कमी करण्यासाठी ऍण्टिएजिंग ट्रीटमेंट केली जाते.
वय वाढत जाते तशी त्वचेच्या पेशींचे विघटन आणि पुनरुत्पादनाची प्रक्रिया मंद आणि अधिक कमकुवत होत जाते. परिणामी, तुमचे वय आणि वृद्ध होण्याची चिन्हे तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर ठळकपणे दिसू लागतात. त्वचेची लवचिकता कमी होते, कोरडेपणा वाढतो, पिंगमेंटेशनची समस्या निर्माण होते. चेहऱ्याच्या त्वचेवर शिरा दिसू लागतात. लालसरपणा वाढतो. बारीक रेषा आणि सुरकुत्या तयार होतात.
कमी वयात एकदा का त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली की, ती पूर्वीसारखी तरुण, चमकदार करणे सोपे नसते. जर डाग, काळे डाग, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची इतर चिन्हे तुमच्या चेहऱयाला त्रास देत असतील आणि तुमच्या प्रतिमेला बाधा आणत असतील तर तुम्हीही तुमच्या डॉक्टरांना भेटून योग्य तो ऍण्टिएजिंग ट्रीटमेंटचा पर्याय निवडू शकता. तुमच्या ऍण्टिएजिंग उपचारांतून तुम्हाला जे परिणाम मिळतील ते मुख्यत्वे सर्जनच्या कौशल्यांवर आणि अनुभवावर अवलंबून असतील. म्हणून सर्वोत्तम त्वचा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रभावी उपचार पद्धती
– ऍण्टिएजिंग ट्रीटमेंटबद्दल ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’चे कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट डॉ. देबराज शोम यांनी माहिती दिली. त्यानुसार, बहुतेक ऍण्टिएजिंग उपचार पद्धती त्वचेवरची वृद्धत्वाची चिन्हे टाळण्यासाठी कार्य करतात आणि तुमच्या चेहऱयावर आधीच दिसून येणारी चिन्हे काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. वृद्धत्वविरोधी आणि चेहऱयावरील सुरकुत्यांसारखी चिन्हे कमी करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत व तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मनासारखा परिणाम मिळविण्यासाठी सर्जिकल आणि नॉनसर्जिकल पर्याय निवडू शकतात.
– चेहऱयावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बरेच प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. जसे की, मायक्रोडर्माब्रेशन, केमिकल पील्स,
फ्रॅक्शनल लेझर थेरपी, बोटय़ुलिनम टॉक्सिन आणि हायलुरोनिक ऍसिड फिलर्स, व्हॉल्यूम वाढवण्याचे तंत्र आणि मेसोथेरपी.