>> रविप्रकाश कुलकर्णी
पुण्यामध्ये रोज किमान एक तरी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होतच असतो, पण प्रकाशनाचा वर्धापन दिन साजरा करणारे प्रकाशक आहेत का?
त्यामध्ये दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. मात्र नक्की आहेत. तो केवळ त्यांचा वर्धापन दिन नसतो, तर पूर्वी लग्नाच्या मांडवात कोणाची तरी मुंजदेखील केली जायची त्याच चालीवर दिलीपराज प्रकाशनच्या कार्पामात मुख्य कार्पामाला जोडून अनेकविध गोष्टींचा भरणा असतो. विशेष म्हणजे त्यांच्या कार्पामाला संपूर्ण बर्वे खानदान सहभागी असते. या विशेषामुळे असेल दिलीपराजचा कार्पाम म्हटला की, हॉल कसा भरगच्च असतो. एरवी समारंभ म्हटला की, श्रोत्यांची किती वानवा असते हे आपण हल्ली अनुभवत असतोच. त्यामुळे पुस्तक प्रकाशनासारख्या कार्पामाला श्रोत्यांना कसे आकर्षित करायचे हे तंत्र राजीव बर्वे आणि मंडळींकडून इतर प्रकाशकांनी घ्यावे. राजीव बर्वे सल्लाही देतील. नाहीतरी दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. चा सर्व पसारा राजीव बर्वे यांनी मधुर व मोहित या आपल्या दोन्ही मुलांवर सोपवला असल्यामुळे ते बाहेरचेच अनेक उद्योग करत असतात. त्यात आणखी एकाची भर पडेल एवढेच काय ते…
तर दिलीपराज प्रकाशनचा 53 वा वर्धापन दिन असाच दणक्यात साजरा झाला. आता मधुर बर्वे निवेदन करण्यात तयार झाले असल्यामुळे ते आपल्याच हातात कार्पाम घेतात आणि बोलता बोलता वर्षात कोणती पुस्तके चालली, कोणत्या पुस्तकाला मागणी आहे हा सगळा वृत्तांतदेखील सांगून टाकतात. या समारंभात अभिजीत जोग यांचे ‘ब्रँडनामा 2.0’ हे पुस्तक प्रकाशित झाले. व्यासपीठावर पाहुणे म्हणून लोकप्रिय लेखक आणि वक्ते प्रवीण दवणे व कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल होते. कुठेही भाषण करणे हा त्यांचा हातखंडा आहे. सगळ्यांना खूश करून टाकतात ते.
या कार्पामात आणखी एक गोष्ट होते ती म्हणजे दिलीपराज सुवर्ण स्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार. ग्रंथ व्यवहारात ग्रंथपोते फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र त्या तुलनेत त्यांची दखल सार्वजनिकरीत्या हवी तशी घेतलेली दिसत नाही. ही उणीव आपल्यापुरती भरून काढण्यासाठी दिलीपराज प्रकाशन त्यांच्या सुवर्ण महोत्सवापासून दरवर्षी एका पुस्तक व पोत्याचा यथासांग म्हणजे शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सन्मान करतात. यंदाचे मानकरी होते कोल्हापूरच्या अक्षरदालनचे रवींद्रनाथ जोशी. सत्काराला उत्तर देताना त्यांनी आधीच सांगितले की, माझ्याबद्दलची सर्व माहिती मला दिलेल्या मानपत्रात आलेलीच आहे, पण मला बोलायला दहा मिनिटे दिली आहेत म्हणून थोडे बोलतो. जास्त बोलणं वाढलं तर थांबवा. पुढे ते एक पुस्तक दाखवत म्हणाले, हे पुस्तक आहे मौज प्रकाशनचे ‘कोरडी भिक्षा’ व लेखक आहेत श्रीनिवास विनायक कुलकर्णी. त्यांनी ही कोरडी भिक्षा तेव्हा आम्हाला दिली ती आजतागायत आम्हाला पुरते आहे.
त्यांच्या या वाक्याला टाळी पडली. कारण मानपत्रात नुसता उल्लेख आहे की, रवींद्रनाथ जोशी मॅट्रिक झाले तेव्हा श्रीनिवास कुलकर्णी यांनी औदुंबर सोडून कोल्हापूरच्या गुलमोहर बुक डेपोच्या अरुण गाडगीळ यांच्याकडे कामाला लावले. पण हाच प्रसंग रवींद्रनाथ जोशी यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ‘कोरडी भिक्षा’ या पुस्तकाला अनुलक्षून पुस्तक आणि उदरनिर्वाहाचे साधन हे चित्रदर्शी भाषेत उभे केले. रवींद्रनाथ जोशी हे केवळ पुस्तक पोते नाहीत, तर डोळस वाचकदेखील आहेत हे स्पष्ट झाले.
अरुण गाडगीळ यांच्या दुकानात रवींद्रनाथांना ग्रंथपीचे धडे तर मिळालेच शिवाय तिथेच काम करणाऱया शोभा त्यांच्या सहचारिणी गीतांजली झाल्या. तसेच सासरेही असे लाभले की, त्यांनी कोळेकर तिकटीवरील साठ चौरस फुटांचा गाळा जावयाला देऊन स्वतंत्र व्यवसायाला उत्तेजन दिले. अंगभूत सच्चेपणाला अपार कष्टाची जोड आणि नशिबाची साथ मिळाल्यामुळे ग्रंथ व्यवसायात बस्तान बसत गेले. रवींद्रनाथ यांचे प्रत्येक पाऊल पुढचे ठरले. परिणामी आज मंगळवार पेठ मुख्य रस्त्याला त्यांचे साडेतीन हजार फुटांचे अक्षरदालन दुकान म्हणजे केवळ ग्रंथ वितरण आणि पीचे केंद्र न राहता साहित्य कला संस्कृती यामध्ये रस असणाऱया मंडळींना एकत्र येण्याचे केंद्र झाले आहे.
त्यातूनच पुढे निर्धार प्रतिष्ठानच्या समीर देशपांडे यांच्या सहकार्याने ‘अक्षर गप्पा’ हा मान्यवरांच्या गाठीभेटीचा कार्पाम गेली 15 वर्षे तिथे चालू आहे. यात लेखक भैरप्पा यांच्यापासून ते सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांचे रंगतदार कार्पाम झाले आहेत आणि यापुढेही होतील.
रवींद्रनाथ जोशी यांच्या या वाटचालीतील भाग्ययोग म्हणजे त्यांची दोन्ही मुले अमेय आणि आलोक त्यांच्याबरोबर याच व्यवसायात आलेले आहेत. याचाच अर्थ अक्षरदालन वर्धिष्णू आहे. त्यांच्या या वाटचालीला शुभेच्छा!