
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राज्यसभेमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडले. या विधेयकाबाबत बोलण्याची व चर्चा करण्याची प्रत्येक पक्षाला संधी मिळाली. काँग्रेससह एमआयएमने या विधेयकाला विरोध केला आहे. एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध करताना भाजपने घोषणापत्रातील आश्वासन तर पूर्ण केले, परंतु राज्यघटनेचे उल्लंघन केल्याचा आरोप लगावला.
ओवैसी म्हणाले, ‘कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकाचा मी विरोध करतो. हे सत्य आहे की भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या घोषणापत्रातील आश्वासनाची पूर्तताना केली आहे, परंतु राज्यघटनेचे उल्लंघन केले आहे. हे विधेयक कलम 3 चे उल्लंघन आहे.’ ओवैसी पुढे म्हणाले की, ईदच्या दिवशी काय होईल? ईद सोमवारी आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की कश्मिरी नागरिक बकऱ्यांचा बळी देण्याऐवजी स्वत: जीव देतील. तुमचीच हिच इच्छा असेल तर ते हे देखील करतीत, ते हे करत आले आहेत, असे ओवैसी म्हणाले.
ईशान्यकडील राज्यांमध्ये नागा लोकांना तेल आणि गॅस देण्यासाठी सरकार तयार आहे. त्यांनी हत्यार उचललं असले तरी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. का? असा सवाल उपस्थित करत ओवैसी यांनी हिमाचलमध्ये मी जमिन खरेदी करू शकतो का? असा सवालही उपस्थित केला.
Asaduddin Owaisi in Lok Sabha: What will happen on Eid? Eid is on Monday. Are you assuming that Kashmiris instead of sacrificing lamb should sacrifice themselves? If you want that I’m sure they’ll do that, they’ve been doing that. #Article370 https://t.co/QwkNCYCw9Z
— ANI (@ANI) August 6, 2019



























































