अरुण काकडे यांना कलारजनी जीवनगौरव

500

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरीवली शाखेचा ‘कलारजनी जीवनगौरक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांना ‘मछिंद्र कांबळी अभिरंगराज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. नाट्यपरिषदेच्या बोरिवली शाखेकडून गेली 19 वर्षे कलारजनी पुरस्कार दिला जातो.

संगीत रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी अभिनेता साई बॅकर यांना गोपिनाथ साकरकर स्वर रंगराज पुरस्कार, उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रंगप्रतिभा पुरस्कार अभिनेत्री तेजश्री प्रधान, लोक रंगभूमीकरील लक्षणीय कार्यासाठी लोकरंग पुरस्कार ओम प्रकाश चक्हाण, हौशी समांतर-प्रायोगिक रंगभूमीच्या विशेष कामगिरीसाठी रंगप्रयोग पुरस्कार अतुल पेठे, ज्येष्ठ रंगमंच कामगारासाठीचा रंगसाज पुरस्कार उल्हास सुर्व यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. नाट्यसमीक्षा पुरस्कार संजय डहाळे यांना तर नभोनाट्यातील लक्षणीय कार्यासाठी स्वराभिनय गौरक पुरस्कार रेश्मा आमडेकर, उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जयेश देसाई, नाट्यसंहिता लेखनासाठी रंगसंहिता पुरस्कार कल्याणी पाठारे यांना जाहीर झाला.

आपली प्रतिक्रिया द्या