अरविंद केजरीवाल दहशतवादी, भाजप खासदाराची जीभ घसरली

509

भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच लावली असून बुधवारी दिल्लीत आणखी एका नेत्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भाजप नेते परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी ठरवले असून त्यांची तुलना कश्मीरमधील दहशतवाद्यांशी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘दिल्लीत सध्या अनेक नटवरलाल आणि केजरीवालांसारखे दहशतवादी लपले आहेत. आम्हाला कळत नाही की आम्ही कश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढायचे की दिल्लीतील केजरीवाल या दहशतवाद्याशी’, असे विधान त्यांनी केले आहे. मंगळवारी देखील परवेश वर्मा यांनी शाहीन बागमधील आंदोलकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी या आंदोलकांना बलात्कारी व खूनी म्हटले होते. ‘ हे लाखो आंदोलक तुमच्या घरात घुसतील व तुमच्या आया बहिणींचे बलात्कार करून खून करतील’, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या