
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची कथित मद्य घोटाळा प्रकरणी राऊज अवेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करत असल्याचे सांगितले.
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता,
न्यायालयाबाहेर येताच ढसाढसा रडले pic.twitter.com/OOLKvO4j8f— Saamana Online (@SaamanaOnline) February 27, 2026
या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झालेय. ”ते सारखे सागंत होते की केजरीवाल भ्रष्ट आहेत पण मी भ्रष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात फक्त प्रामाणिकपणा कमावला आहे. यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. आज न्यायालयाने सांगितले की केजरीवाल कट्टर प्रामाणिक आहे, मनीष सिसोदीया कट्टर प्रामाणिक आहे, आम आदमी पार्टी कट्टर प्रामाणिक आहे”, असे केजरीवाल म्हणाले.
”आज न्यायालयाने सर्व आरोप खारीज केले आहेत व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केले. आम्ही नेहमी सांगायचो की सत्याचा विजय होतो. आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मी न्यायमूर्ती साहेबांचे आभार मानतो त्यांनी आमच्यासोबत न्याय केला. देव आमच्या सोबत आहे. मोदीजी आणि अमित शहा यांनी मिळून आम आदमी पार्टीविरोधात सर्वात मोठे षडयंत्र रचले होते. आमच्या मोठ्या पाच नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबले. संपूर्ण खोटी केस होती. 24 तास न्यूज चॅनेलवर केजरीवाल भ्रष्ट आहे अशा बातम्या दाखवल्या जायच्या”, असे केजरीवाल म्हणाले.


























































