केजरीवाल म्हणजे दहशतवादी! केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे वादग्रस्त विधान

585

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणजे दहशतवादी असे वादग्रस्त विधान केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशय निरागस चेहरा घेऊन लोकांमध्ये जातात आणि किचारतात की, मी दहशतकादी आहे का? प्रत्यक्षात केजरीकाल दहशतकादीच आहेत आणि त्याचे भरपूर पुरावेही आहेत. त्यांनी स्वतः म्हटले होते की, ते अराजकतावादी आहेत. अराजकतावादी आणि दहशतवादी यात जास्त काहीच फरक नाही. दोघेही सारखेच असतात अशी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या या विधानानंतर आम आदमी पार्टीनेदेखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

…तर केजरीवालांना अटक करूनच दाखवा – आप

केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला दहशतवादी म्हणण्याचा आम आदमी पक्षाने तीव्र निषेध केला आहे. ज्या दिल्लीत केंद्र सरकार विराजमान आहे, ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे मुख्यालय आहे त्याच ठिकाणी हे सर्व काही घडत आहे. एक केंद्रीय मंत्री अशी भाषा वापरू शकतो का, असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंह यांनी केला. केजरीवाल खरंच दहशतवादी असतील तर त्यांना अटक करून दाखवा, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या