
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे पंजाबमधून राज्यसभेवर जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘आप’चे राज्यसभेतील खासदार संजीव अरोडा यांना पक्षाने लुधियाना पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे केजरीवाल यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.