
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘जिओ इन्स्टिट्यूट’ला अस्तित्वात येण्याआधीच केंद्र सरकारने श्रेष्ठत्वाचा दर्जा बहाल केल्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तोफ डागली.
‘मोदी सरकार हे अंबानींसारख्या उद्योगपतींच्या खिशात आहे’ असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला. पूर्वी काँग्रेसचे सरकार हे अंबानी यांच्या खिशात असायचे. आता ती जागा मोदी सरकारने घेतली आहे. काही बदलले आहे काय, असा सवाल केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला आहे.



























































