परळीच्या उड्डाणपूलावर राखेचा टँकर पलटला ; रात्री अपघात झाल्याने जिवीतहानी टळली

 राखेच्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस आहे,हायवा मधून उघडी होणारी राखेच्या वाहतुकीचा त्रास आधीच परळीसह परिसरातल्या नागरिकांना होत आहे. रविवारी रात्री परळीच्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावर राखेचा टँकर पलटी झाल्याने उड्डाण पुलाच्या कठडे तुटले आहेत.रात्री 11.30 च्या दरम्यान अपघात झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी या घटनेत झाली नाही.

थर्मल मधून राखेची वाहतूक करणारा टँकर रात्री रेल्वे स्टेशन रोडवर जात असताना उड्डाणपूलाच्या टॉवर कडे जाणाऱ्या वळणावर ताबा सुटल्याने अपघात झाला.मात्र या अपघातामुळे उड्डाण पुलाची सुरक्षा कठडा तुटून मोठे नुकसान झाले आहे.अपघात झालेल्या ठिकाणी पुलावरील बस थांबा व बाजूलाच पोलीस चौकी असल्याने रात्री झालेल्या अपघाताने मोठी जीवित हानी टळली आहे.राखेच्या होणाऱ्या वाहतूकीवर कारवाई होणे गरजेचे झाले असून पोलीस प्रशासन कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागलेले आहे.