
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते, लता दीदी यांच्या नंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या, भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला. त्यांचे गाणे हेच त्यांचे अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

























































