रत्नागिरी जिल्हापरिषद अंगणवाडी सेविका,आशांना 500 रूपये प्रोत्साहन भत्ता देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधी लढ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, एएनएम जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांच्यासाठी रत्नागिरी जिल्हापरिषदेने 500 रूपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिने हा प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे, आरोग्य सभापती महेश म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे यांनी संयुक्तरित्या प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा हा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिने दर महिन्याला 500 रूपये प्रोत्साहनपर भत्ता अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी आणि अर्धवेळ काम करणाऱ्या एएनएम यांना मिळणार आहे. त्यासाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.