भाजप नेते अशोक भांगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

3560

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या शनिवारी झालेल्या नगर येथील सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजप नेते अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे व्यासपीठावर उपस्थित होते. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अकोले मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पिचड विरोधक असलेले अशोक भांगरे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टवादी काँग्रेस प्रवेश केला. तर किरण लहामटे अकोले येथे 23 रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकांच्या तारखेची घोषणा झाल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या