कोरोनामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजुरांना मदत करा – अशोक चव्हाण

968

कोरोना विषाणूमुळे शेतकरी, शेतमजूर भयंकर अडचणीत आला आहे. त्याला केंद्र सरकारने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन खासगी हॉस्पिटलमध्ये झुंज देत असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे महासचिव राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी वढेरा यांनी आज देशभरातील काँग्रेस नेत्यांशी ‘स्पीक ऑफ इंडिया’ मोहिमेअंतर्गत संवाद साधला. यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे नेते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे राज्यातील शेतकरी व शेतमजुरांची परवड होत असून अशा वेळी केंद्र सरकारने सढळ हाताने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या