मोदी सरकार विरोधकांना शत्रूसारखे वागवतेय -गेहलोत 

modi-ashok-gehlot

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात भाजपप्रणीत मोदी सरकार गांधी आणि नेहरू कुटुंबावर दबाव आणत आहे, त्यांना लक्ष्य करत आहे. विरोधी पक्षांना एखाद्या शत्रुप्रमाणे वागवत आहे, असा आरोप राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. देशाला चुकीच्या दिशेने नेले जात असून ईडी, आयटी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. नऊ वर्षांपुर्वी बंद केलेले प्रकरण आता नऊ वर्षांनी केवळ सुडबुद्धीने पुन्हा उकरून काढण्यात आल्याचा आरोपही गेहलोत यांनी केला. मोदींना काँग्रेस पक्ष संपवायचा असून काँग्रेसमुक्त भारत करण्याबद्दल मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते,याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. शिमला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.