आशियाई बुद्धिबळ स्पर्धा- हिंदुस्थानचे दोन्ही संघ फायनलमध्ये

हिंदुस्थानने पुरुष व महिला या दोन्ही गटांमध्ये शानदार कामगिरी करीत आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली. हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघाने कझाकिस्तानच्या संघाला हरवत आगेपूच केली.

बी अधिबान याने विजय मिळवत हिंदुस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. निहाल सरीन, एसपी सेतुरामन व के शशीकरण यांना ड्रॉवर समाधान मानावे लागले. हिंदुस्थानच्या महिला संघाने मांगोलियाला हरवत पुढे पाऊल टाकले.

या लढतीत आर वैशाली हिने नेत्रदीपक कामगिरी केली. हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाचे तर महिला संघासमोर इंडोनेशियाचे आव्हान असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या