बुलेटप्रूफ जैकेट, शील्ड आणि बंकर…, ऑपरेशन सिंदूरमुळे पाक सैन्यप्रमुख असीम मुनीरला सुरक्षेसाठी काय-काय करावं लागतयं!

कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदूस्थानने पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून पाकिस्तानची पळता भूई थोडी केली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे. याबाबत जरी त्यांनी कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावरील फोटोंमुळे पाकिस्तानातील चित्र स्पष्ट होत आहे.

दोन दिवसांपूर्वीच युद्धादरम्यान आम्ही बंकरमध्ये लपण्याच्या तयारीत होतो, असे विधान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी केले होते. अशातच आता सोशल मीडियावर पाकिस्तानचा सैन्य प्रमुख असीम मुनीर यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये मुनीर यांनी लीबिया दौऱ्यादरम्यान बुलेटफ्रुफ जॅकेट परिधान केल्याचे दिसत आहे. याशिवाय 24 डिसेंबर रोजी रावळपिंडीत झालेल्या 273 व्या कॉर्प्स कमांडर कॉन्फरेन्सला संबोधित करताना देखिल बुलेटप्रूफ ट्रान्सपरेंट काचेच्या मागे बसले होते. यावेळचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पाक सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी अलिकडेच लिबियाला भेट दिली. या दौऱ्यातील असीम मुनीर यांच्या गणवेशाने सगळ्याचे लक्ष वेधले. या भेटीदरम्यान असीम मुनीरने त्याच्या लष्करी गणवेशाखाली बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते असा अंदाज आहे. असीम मुनीरचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे. या फोटोंमध्ये असीम मुनीरच्या लष्करी गणवेशावर बुलेटप्रूफ जॅकेटची रेषा स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे त्याचे शरीरही फुगलेले दिसत आहे.

पाकिस्तानमधील इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे नेतेही मुनीरबाबत भाष्य करत आहेत. नेते मिर्झा शहजाद अकबर म्हणाले की, असीम मुनीर इतका घाबरला आहे की तो बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तानातील वातावरणाचा अंदाज घेता येत आहे. ये डर अच्छा लगा…, असे म्हणत नेटकऱ्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

बंकरमध्ये लपण्याच्या मार्गावर होतो, ‘ऑपरेशन सिंदूर’वर पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची कबुली