एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारूच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. या काळात अॅम्ब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावरदेखील लक्ष ठेवले जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झाले याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आले आहे. या ऑप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरू असेल तर केवळ फोटो काढून या ऑप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.