
हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना बंगळुरूमध्ये ट्रफिकचा फटका सहन करावा लागला. 34 किलोमीटर प्रवासासाठी त्यांना तब्बल 3 तास प्रवास करावा लागला. ते एका कार्यक्रमासाठी बंगळुरूला आले होते. जुलै 2025 मध्ये शुभांशू शुक्ला ऑक्सिओम मिशन 4 चा भाग म्हणून आयएसएसला भेट देणारे पहिले इस्रो अंतराळवीर बनले आहेत.
ट्रफिकमध्ये अडकल्यानंतर यावर बोलताना शुभांशू शुक्ला म्हणाले की, अंतराळातून बंगळुरूला पोहोचणे सोपे असले तरी मराठाहल्ली ते शिखरापर्यंत 34 किमी प्रवास करण्यासाठी तिप्पट जास्त वेळ लागला. शुभांशू यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी घेतली. शहरातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी काम करत आहे. भविष्यात अशा समस्या टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे खरगे म्हणाले.





























































