एफएटीएफच्या बडग्याने पाकिस्तान भयभीत, हाफिजपाठोपाठ ‘जमात’च्या अन्य दोन नेत्यांनाही तुरुंगवास

पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदपाठोपाठ त्याच्या दोन सहकाऱयांनाही शुक्रवारी सहा आणि साडेपाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

पाकिस्तानातील ‘जमात’च्या नेत्यांवर दहशतवाद माजवल्याचे एपूण 41 खटले दाखल आहेत. त्यातील 24 खटल्यांचा निकाल अँटी टेररिस्ट न्यायालयाने लावला आहे. शुक्रवारी लाहोरच्या न्यायालयाने हाफिजचे सहकारी जेयूडी नेते मुहम्मद अशरफ आणि लुकमान शाह यांना अनुक्रमे 6 वर्षे आणि साडेपाच वर्षे तुरुंगवासाची व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

एफएटीएफच्या कडक इशाऱयाने पाकची पार तंतरली आहे. त्यामुळे भिकेकंगाल पाकिस्तानपुढे आता मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश ए मोहम्मदचा संस्थापक हाफिज सईद याला शिक्षा करण्यावाचून अन्य पर्यायच उरलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या