सरकार कुणाचंही असो, बलात्कारी आणि त्याचा बचाव करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी
राज्यात बदलापूरसह विविध ठिकाणी घडलेल्या महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबद्दल भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिंधे आणि फडणवीसांना कडक शब्दांत बजावले. सध्या घडलेल्या घटना पाहता महिलांचा राग मी समजू शकतो. त्यामुळे सर्वच पक्षांना आणि राज्य सरकारला सांगतो की, महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे.
सरकार कुणाचंही असो, बलात्कारी आणि त्याचा बचाव करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशा शब्दांत पंतप्रधानांनी जळगाव येथील सभेत मिंधे सरकारचे अक्षरशः कान टोचले. सरकारे येतील- जातील परंतु, महिलांच्या चारित्र्याचे रक्षण व्हायलाच हवे. आपण एक समाज म्हणून, एक सरकार म्हणून त्यांचे संरक्षण करायला हवे, तेच आपले मोठे कर्तव्य आहे, असे मोदींनी सुनावले.