
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनतादरबारादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलीस आयुक्त एसबीके सिंह यांना तत्काळ पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी सतीश गोलचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जोधपूरला जाणारे विमान मुंबईला परतले
मुंबईहून जोधपूरला जाणाऱया एअर इंडियाच्या एआय 645 विमानाला आज मुंबई विमानतळावर परत आणण्यात आले. उड्डाण केल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. वैमानिकांनी विमानाचे मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले.
आईवडिलांना मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; कारवाईचे आदेश
डोंबिवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रवीण घुटुगडे व धनंजय चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. वृद्ध आईवडिलांना मारहाण करणाऱया मुलाविरोधात वेळीच गुन्हा न नोंदवल्याने न्यायालयाने हे आदेश दिले.
ईपीएफओचा विक्रम; जूनमध्ये 22 लाख नोकऱया
नवी दिल्ली ः ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नवीन विक्रम रचला आहे. जून 2025मध्ये ईपीएफओने 21.89 लाख नवीन सदस्य जोडले. म्हणजेच सुमारे 22 लाख लोकांना औपचारिक नोकऱया मिळाल्या.
संसदेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; एकाला पकडले
नवी दिल्ली ः संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक समोर आली. आज सकाळी एका व्यक्तीने राज्यसभा सभागृहात अनधिपृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱयांनी त्याला पकडले असून तो उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले.