ऑगस्टमध्ये बँकांचे लॉकडाऊन!

760

कोरोनाच्या लॉकडाऊनमधून देश अनलॉक होत असला तरी ऑगस्टमध्ये बँकांचा ‘लॉकडाऊन’ असणार आहे. ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या सुटय़ांमुळे देशभरातील बँका  तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. यामुळे कॅलेंडरवरील लाल तारिख बघूनच आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत.

हिंदूंचा पवित्र श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात अनेक सणवारांच्या निमित्ताने सार्वजनिक सुटी असते. त्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 ऑगस्टला बकरीदची सुटी आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असून अनेक राज्यांमध्ये या सणाची सुटी देण्यात येते. त्यानंतर जन्माष्टमी आहे. 8 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारची सुटी आहे. 22 ऑगस्टला गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, तामिळनाडू, गोव्यात गणेश चतुर्थीची सुटी आहे. याच दिवशी चौथा शनिवार असल्यामुळे देशातही सुटी असणार आहे. 29 ऑगस्टला झारखंडमध्ये करमा पुजेची सुटी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या