संभाजीनगर जिल्ह्यात 204 बाधितांची वाढ; बाधितांची संख्या 7,338 वर

530

संभाजीनगर जिल्ह्यात आज २०४  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. ४०३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७३३८ एवढी झाली आहे. आजपर्यंत ३३० जणांचा मृत्यू झाला असल्याने एकूण २९७५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात वाढलेल्या २०४ रुग्णांपैकी  मनपा क्षेत्रातील १२२ तर ग्रामीण भागातील ८२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

मनपा हद्दीत १२२ रुग्ण
संभाजीनगर महानगरपालिक क्षेत्रात आज १०० बाधित आढळूय आले असून यामध्ये हर्सुल जटवाडा रोड (१), मिल कॉर्नर (१), एन अकरा, हडको (५), सिडको (१), अमृतसाई प्लाझा (२१), भगतसिंगनगर (१), एन सहा सिडको (१), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (१), एकनाथनगर (१), शहागंज (१), शिवाजीनगर (३), कटकटगेट (१), वसंत विहार (१), हुसेन कॉलनी (१), मारोतीनगर (२), देवळाई (१), सातारागाव (१), चिकलठाणा (२), नंदनवन कॉलनी (१), राजेसंभाजी नगर (३), स्वराजनगर (१), गुरुगोविंदसिंगपुरा (१), जवाहर कॉलनी (१), पिसादेवी (१), समर्थनगर (१), एन सात, अयोध्यानगर (१), हर्सुल (१), खोकडपुरा (३), पैठणगेट (१), शिवशंकर कॉलनी (४), पवननगर (१), जाफरगेट (१), पद्मपुरा (१४), दशमेशनगर (१), गजानननगर (२), रमानगर (१), सुरेवाडी (१), जालाननगर (३), ज्योतीनगर (१), छावणी (२), रामनगर (१), फुले चौक, संभाजीपेठ  (१), एसटी कॉलनी (१), जाधववाडी (३), टीव्ही सेंटर (२) कासलीवाल मार्बल (१), नक्षत्रवाडी (५), बारूदघर नाला (१), मनपा  परिसर (१), कांचनवाडी (१४) या बाधितांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ८२ रूग्ण
ग्रामीण भागात आज सायंकाळपर्यंत ६८ रुग्ण आढळून आले. यामध्ये दत्तनगर, रांजणगाव (२), रांजणगाव (२), कराडी मोहल्ला, पैठण (१), वरूड काझी (१), सारोळा, कन्नड (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), अजिंठा (२०), वडगाव कोल्हाटी (१), सिडको बजाज नगर (१), वडगाव साईनगर, बजाजनगर (१), छत्रपतीनगर, वडगाव (२), वडगाव, बजाजनगर (१), विश्वविजय सो., बजाजनगर (१), एकदंत सो., बजाजनगर (१), आनंद जनसागर, बजाजनगर (१), वळदगाव (१), सुवास्तू सो., बजाजनगर (१), सासवडे मेडिकल जवळ, बजाजनगर (६), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाजनगर (४), साराकिर्ती, बजाजनगर (२), गणपती मंदिरासमोर, बजाजनगर (२), पाटोदा, बजाजनगर (२), वडगाव कोल्हाटी, संगमनगर, बजाजनगर (२), अन्य (१), बालाजी सो., बजाजनगर (४), लक्ष्मीनगर, पैठण (४), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (१) नेहाविहार, तिसगाव बजाजनगर (१) हतनूर, कन्नड (३) कन्नड बाजारपेठ (१), खांडसरी, कन्नड (२), अंधानेर, कन्नड (१), जयभवानीनगर, सिल्लोड (२), समता नगर, सिल्लोड (१), शिवना, सिल्लोड (१), हनुमान नगर, अजिंठा (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

घाटीत २ तर खासगी रुग्णालयात १ कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सात जुलै रोजी शहरातील जटवाडा रोड, हर्सुल येथील ५५ वर्षीय स्त्री, पैठण तालुक्यातील ३२ वर्षीय स्त्री, तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात पडेगावातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत २४९, विविध खासगी दवाखान्यांमध्ये ७९, जिल्हा सामान्य रुग्णालयात ०२ अशा  एकूण ३३० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या