संभाजीनगर जिल्ह्यात 237 नव्या बाधितांची भर, 5211 रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आज एकूण 237 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33648 झाली आहे. आजपर्यंत 27 हजार 500 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 937 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5211 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 69 आणि ग्रामीण भागात 47 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
ग्रामीण भागात 85 रुग्ण
ग्रामीण भागात आज 85 रुग्ण आढळून आले. यात गोळेगाव (1), लासूर स्टेशन गंगापूर (1), वसाडी कन्नड (1) सोबळगाव, रत्नपूर (1), अर्जुननगर, रांजणगाव (1), गेवराई पैठण (1), बजाजनगर, वाळूज (2), खामगाव फुलंब्री (1), अब्दी मंडी (1), बोरगाव (1), साई नगर, बजाजनगर (1), आयोध्यानगर, वडगाव (1), खोरी रांजणगाव (1), चंद्रलोक नगरी, कन्नड (6), सरस्वती कॉलनी, कन्नड (2), नूतन कॉलनी, गंगापूर (1), शिवाजीनगर, गंगापूर (1), लगडवस्ती गंगापूर (2), व्यंकटेश नगर, वैजापूर (1), नाडी वैजापूर (1), साईनाथ कॉलनी वैजापूर (1), लाडगाव रोड, वैजापूर (2), लिंबेजळगाव (1), मानसपिंप्री शेणगाव (1), आडगाव (1), सिल्लोड (1), प्राथमिक आरोग्य केंद्र, वेरुळ (2), संभाजीनगर (20), फुलंब्री (4), गंगापूर (5), कन्नड (4), वैजापूर (9), पैठण (3), सोयगाव (3)

मनपा क्षेत्रात 83 नवे बाधित
मनपा क्षेत्रात आज 83 नवे बाधित आढळून आले.यामध्ये जटवाडा रोड (1), रेल्वे स्टेशन (1), उदय कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), नागेश्वरवाडी (1), गजानन कॉलनी, गारखेडा (2), गारखेडा परिसर (2), एन दोन सिडको (2), चिकलठाणा (2), संभाजीपेठ (1), हडको (1), एन चार सिडको (1), रवींद्र नगर (1), अन्य (5), सुदर्शन नगर (3), एन तीन सिडको (1), बीड बायपास (2), म्हाडा कॉलनी (1), घाटी परिसर (1), स्वामी विवेकानंद नगर (3), विश्वभारती कॉलनी (1), जिल्हा परिषद परिसर (1), कांचन नगर (1), पद्मपुरा (3), ज्योती नगर (2), एन तेरा (1), एन सात सिडको (2), हनुमान नगर (1), टिळक नगर (1), विठ्ठल नगर (2), ठाकरे नगर (3), एन एक सिडको (2), राहत कॉलनी (1), मनपा परिसर (1), एकनाथ नगर (1), मधुबन सो., (1), विद्या नगर (1), देवानगरी (2), साईनगरी (1), नंदनवन कॉलनी (1), रेणुका नगर (1), हिरण्य नगर (2), जालन नगर (1), शंकर नगर, इटखेडा (1), धूत हॉस्पीटल परिसर (2), एन अकरा (1), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंपाजवळ (1), पवन नगर (1), समर्थ नगर (1), एन एक टाऊन सेंटर (2), बजाज नगर (1), घाटी नर्सिंग हॉस्टेल (1), एन पाच सिडको (1), विश्वेश्वर कॉलनी (1), बन्सीलाल नगर (1), नारळीबाग (1), नागेश्वरवाडी (1), पद्मपुरा (2)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत छत्रपती नगर, वडगावातील 48 वर्षीय पुरूष, तळेगाव, फुलंब्रीतील 46 वर्षीय पुरूष, जोगेश्वरी वाळूजमधील 70 वर्षीय स्त्री, एन सात सिडको 58 वर्षीय पुरूष, चेलिपुरातील 50 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात तांदोळी, पैठण येथील 58 वर्षीय पुरूष, वीरगाव, वैजापुरातील 77 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या