संभाजीनगरमध्ये आज 47 कोरोनाबाधितांची वाढ; एकूण संख्या 1696 वर

516

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1696 झाली आहे. यापैकी १०८५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता५२६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४ सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (१), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१), सिल्लेखाना नूतन कॉलनी (१), बारी कॉलनी (१),उल्का नगरी (१),एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१),शरीफ कॉलनी (१),कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (1), सुराणा नगर (2), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-चार ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी ६.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६८, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १६, मिनी घाटीमध्ये १ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ८५कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या