
संभाजीनगरामध्ये बजाजनगरातील महाराणा प्रताप चौक परिसरात असलेल्या घुश्मेश्वर हॉस्पिटल परिसरात एका अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.
बजाजनगरात सकाळी रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाले माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीच्या डोक्यात दगड किंवा लोखंडी रॉडसारख्या हत्याराचा वापर करून जीवे मारल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर तात्काळ घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले. हा परिसर पोलिसांनी सील केला आहे.



























































