संभाजीनगर शहर धोक्यात, कोरोना बाधीतांचा आकडा 17 वर

894

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीतांच्या संपर्कातील आणखी दोघांना आणि किराडपुऱ्यातील एका तरुणाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाचे तीन रुग्ण वाढले असून आता शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या 17 वर पोहचली आहे, असे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगीतले.

संभाजीनगर शहरात रोजच कोरोनाबाधीतांचा आकडा वाढू लागला आहे. मंगळवारपर्यंत असलेली 14 बाधीतांची संख्या आता बुधवारी 17 वर पोहचली आहे. परिणामी संपुर्ण शहराला कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून येत आहे. डॉ. कुलकर्णी यांनी सांगीतले की, रोशनगेट येथील रहिवासी व जाॅर्डनवरुन परतलेला 38 वर्षीय युवकाला तीन दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या 28 वर्षीय पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. तर सह्याद्रीनगरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बॅक अधिकाऱ्यांच्या 28 वर्षीय मुलाला देखील कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे त्या मृताच्या घरातील तीघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच किराडपुरा येथील 22 वर्षीय तरुणाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. तो काेरोनाबाधीतांच्या संपर्कातला नसल्याचेही डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या