संभाजीनगरचे 620 जण होम क्वारंटाईन मुक्त, 73 जणांवर बारकाईने लक्ष

संभाजीनगर शहरातील एका खासगी महाविद्यालयातील प्राध्यापिकेला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. या प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या 620 विद्यार्थ्यांसह कर्मचा-यांची तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले, अशी माहिती आरोग्य अधिकारी डाँ. निता पाडळकर यांनी दिली.

शहरातील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापक महिला विदेशात सहलीला गेल्या होत्या. सहलीवरुन परत आल्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील विद्याथ्याँंना शिकवले. तसेच कर्मचा-यांच्या संपर्कात देखील आल्या. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या कोरोना पॉझिटिव्ह निघताच मनपा आरोग्य विभागाने तातडीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांचे स्वँब घेतले. स्वँब निगेटिव्ह आल्यानंतर विद्यार्थ्यांश कर्मचा-यांना 14 दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले. प्राध्यापिकेची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिचार्ज देण्यात आला. गुरुवारी विद्याथीँ व कर्मचारी मिळून 630 जणांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यामुळे या सर्वांना मुक्त करण्यात आले.

73 जणांवर लक्ष
शहरात विदेशातून आलेल्या 73 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची 14 दिवसाची मुदत संपली नसल्याने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे पाडळकर यांनी सांगितले.

69 संशयीतांचे रिपोर्ट निगेटिव्ह
शहरातील कोरोना संशयीत म्हणून जिल्हा रुग्णालयाकडून 78 संशयीतांचे स्वँब घेवून तपासणीसाठी एनआयव्हीच्या प्रयोगशाळेत पाठवले. त्यापैकी 69 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. उर्वरीत 9 जणांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झाले नसल्याचे डाँ. पाडळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या