संभाजीनगरात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या 18 वर, यंत्रणा सतर्क

534

संभाजीनगर, शहरात आज गुरूवारी आणखी एका 59 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 22 वर्षीय कोरोनाबाधीत युवकाच्या संपर्कातील हा व्यक्ती असल्याचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. परिणामी शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा 18 वर पोहचला आहे. त्यात एकाचा मृत्यू आणि एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहेत. तर 15 जणांवर मिनी घाटीच्या आयसोलेशन कक्षात आणि एका 7 वर्षीय बालिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संभाजीनगर शहरात कोरोनाबाधितांची संख्या आकडा वाढू लागला आहे. त्यात दोन दिवसांत सहा रुग्ण वाढल्यामुळे बाधीतांचा आकडा 17 वर पोहचला होता. तर आज गुरूवार, किराडपुऱ्यातील 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्यक्ती आधीच्या 22 वर्षीय कोरोनाबाधितांच्या संपर्कातील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे संभाजीनगर शहरात चिंता व्यक्त केली जात आहे. रोजच वाढत असलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे येथील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

39 अहवाल निगेटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालयात (कोविड हॉस्पिटल) पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर बुधवारी आढळून आलेल्या तीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅकमधील लोकांची तपासणी करुन स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 39 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आज एक पॉझिटिव्ह आणि 39 निगेटिव्ह आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या