संभाजीनगरमध्ये हरसूल कारागृहातील कैदी कोरोनाबधित

536

संभाजीनगर शहरातील हरसुल कारागृह येथील एक 25 वर्षीय कैदी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे दरम्यान असे काही घडलेच नसल्याचा कांगावा मात्र कारागृह अधीक्षकांकडून करण्यात येत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील मध्यवर्ती कारागृह हरसूल येथील एक 25 वर्षांचा कैदी आज कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्या कैद्याला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान,  आमच्या कोणत्याही कैद्याला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नसल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी सांगून संभाषण कट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या