संभाजीनगरात वादळी वारा, पावसाने मका पिकाचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्वदूर पाऊस झाला. या पावसाबरोबर सुटलेल्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे मका पिक शेतात आडवे होऊन पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील पिके आडवी झाले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 47 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने नक्षत्र बदलताच पुन्हा एकदा धो-धो बरसायला सुरुवात केली आहे. काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याभरात ठीक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाबरोबरच वादळी वारा आल्याने उंच उंच वाढलेली मका आडवी पडली आहे. जिल्ह्यात जवळपास सरासरी 47 मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये पन्नास मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे . संभाजीनगर पैठण कन्नड सिल्लोड आणि रत्नपूर या तालुक्यांमध्ये सरासरी 50 टक्क्यांहून अधिक पाऊस पडला जिल्ह्यातील मका लागवडीचे क्षेत्र 2 लाख 15 हेक्टर असून सध्या मका पीक वाढीच्या जोरावर आहे मृग नक्षत्रात मका पिकाची लागवड झाल्याने आज पिकांची उंची चार ते पाच फूट पर्यंत झाली आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ठिकाणी पाऊस सुरू झाला या पावसापाठोपाठ सोसाट्याचा वारा सुटल्याने कन्नड, वैजापुर, सिल्लोड रत्नपुर गंगापुर आदी तालुक्यातील मका पीक आडवे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करत आहे.