हर्षवर्धन जाधवची स्टंटबाजी; घरावर हल्ला झाल्याचा कांगावा

752

शिवसेना नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जाधवने आज स्टंटबाजी करून घरावर हल्ला झाल्याचा कांगावा केला. दरम्यान, हर्षवर्धन जाधवच्या विरोधात आजही मराठवाडय़ात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी पोलिसांत तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव याने चिंचोली लिंबाजी येथे प्रचार सभेत बोलताना अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवसेना नेत्यांवर टीका केली. हर्षवर्धन जाधव याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होताच संतापाची लाट उसळली. बेताल वक्तव्य अंगलट येऊन सर्वत्र छीथू होत असल्यामुळे बिथरलेल्या हर्षवर्धन जाधव याने आज समर्थनगर येथील आपल्या घरावर हल्ला झाल्याचा कांगावा केला.

आपली प्रतिक्रिया द्या